Home अमरावती जिजामाता माध्य. शाळा व क.म.वि.मध्ये माँसाहेब जिजाऊ जयंत्युत्सव व स्नेहसंमेलन संपन्न

जिजामाता माध्य. शाळा व क.म.वि.मध्ये माँसाहेब जिजाऊ जयंत्युत्सव व स्नेहसंमेलन संपन्न

174

 

अमरावती ( प्रतिनिधी )-विदर्भ समाजकल्याण व
बहुउद्देशीय संस्था, येरला, ता. मोर्शी, जि. अमरावती व्दारा संचालित जिजामाता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, मोर्शी येथे राजमाता माँसाहेब जिजाऊं यांच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त दि.९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत जिजामाता जयंत्युत्सव व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले .
जिजामाता जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष सुहासराव ठाकरे (अध्यक्ष, विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था, येरला ) होते,उद्घाटक महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य ॲड.किरण सरनाईक (शिक्षक आमदार, अमरावती विभाग) होते.प्रमुख वक्ते मा.श्री.सुधाकरराव घोटे (से.नि. मुख्याध्यापक) तर प्रमुख अतिथी सौ.विमलताई वि. ठाकरे (उपाध्यक्षा, विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था, येरला ) विकासराव ना.ठाकरे (संस्था सचिव), प्राचार्य मा.सुधीरकुमार सवाई,मा. एस. एस.राऊत (संस्था कोषाध्यक्ष), मा.एस.एन.येवले (कार्यकारिणी सदस्य), पी. आर. पाटील (कार्यकारिणी सदस्य), डॉ.पंकजराव केचे (कार्यकारिणी सदस्य), सौ. शुभाताई सु. ठाकरे (कार्यकारिणी सदस्य),मा. विजयराव शिरभाते (सदस्य शाळा समिती), दीपकराव भुयार (सदस्य, शाळा समिती), भैय्यासाहेब इंगळे (सदस्य शाळासमिती) होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख वक्ते, प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते माँसाहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
मान्यवर पाहुण्यांचे स्वागत नृत्य गीतातून करण्यात आले तसेच पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन प्राचार्य मा.सुधीरकुमार सवाई व शिक्षकांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
—–

माँसाहेब जिजाऊ जनकल्याणकारी राजमाता-आमदार किरणजी सरनाईक

जयंत्युत्सव व स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आमदार किरणजी सरनाईक (महाराष्ट्र विधान परिषद सदस्य ) यांनी दीप प्रज्ज्वलित करून केले आणि आपल्या उद्घाटकीय भाषणामध्ये त्यांनी ,”राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बालपणी केलेल्या सुसंस्कारामुळे ते हिंदवी स्वराज्य उभारू शकले व त्याचे रूपांतर सुस्वराज्यात करू शकले. जिजामाता या रयतेच्या दुःख नष्ट करणाऱ्या जनकल्याणकारी राजमाता होत्या.”असे विचार व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते ‘परिमल’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.परिसर स्वच्छता, वर्ग सजावट स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांनी केले.

” मान्यवरांचा सत्कार”

माजी प्राचार्या कु.मायाताई मुळे, डॉ. सौ. ऋतुजाताई सागर श्रीराव (श्रीराव मल्टीस्पेशीलीटी हॉस्पिटल, मोर्शी),कु.पी.एस.विरखरे मॅडम व कु.स्नेहालता अर्डक मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
तसेच शाळेतील वर्ग दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम पुष्पगुच्छ व समानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .
संस्थाध्यक्ष मा.सुहासराव ठाकरे यांनी अध्यक्षीयभाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकेले.संस्था सचिव मा.विकास ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. सुधाकरराव धोटे यांनी ” राजमाता जिजाऊ यांचे जीवन व कार्य ” या विषयावर विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मा.सुधीर कुमार सवाई यांनी केले.

” वक्तृत्व स्पर्धेतून झाली शिवरायांच्या सर्वधर्मसमभावाची जाण ”

” छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभाव” या विषयावर प्राचार्य मा.सुधीरकुमार सवाई यांच्या अध्यक्षतेत वर्ग पाच ते बारावी ची वक्तृत्व स्पर्धा कु.ज्योती पद्मने यांच्या संयोजनामध्ये घेण्यात आली.
—–

प्रभात फेरीने मोर्शी नगरी दुमदुमली

माँसाहेब जिजाऊ जयंती निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभातफेरीचे उद्घाटन मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांनी केले.याप्रसंगी प्रमुख अतिथी मा.सुहासराव ठाकरे,मा. एस. एस.राऊत,उद्योजक मा. शिरभाते,मा.इंगळे ,मा.संजय गारपवार,मा.अजयभाऊ पाटील,मा.राजाभाऊ बेले,मा. अशोकभाऊ गाडगे, मा.राठी, मा. विघ्ने साहेब,मा.खेरडे,मा.पिकले होते.या प्रभात फेरीतील जिजामाता व छ.शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीने सर्वांचे लक्ष वेधले होते तसेच लेझीम पथक सर्वांच्या आकर्षणाचा विषय झाला होता.जिजामाता व छ.शिवाजी महाराज यांच्या जयघोषांनी पूर्ण मोर्शी नगरी दुमदुमली होती.
मा.सौ. सोनालीताई गौरव ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध देशभक्तीपर गीतांवर तसेच विविध गीतांवर विद्यार्थी विद्यार्थिनींनी आकर्षक नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन कु.व्ही.ई. कानबाले मॅडम तर आभार जे. एस. सराटकर सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. पी. ठाकरे, जे.एस. सराटकर, कु. एस. वाय. अजमिरे, कु. व्ही. ई. कानबाले, प्रा.आर.जी. कोटांगळे, प्रा. कु. पी. एस. विरखरे, कु. ज्योती पद्मने ( बुंदेले ),कु. एस. जी.गाडगे,श्री बी.एन.भारती, प्रा. कु. यू. बी. ढोकणे,प्रा.डी.बी. जावळे, प्रा.कु.एस.एल.राठोड सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी डी. ए. तंतरपाळे, एम. एन.गोमकाळे, एन.जी. चौधरी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here