Home महाराष्ट्र लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

194

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.10जानेवारी):-लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि सोलापूर जिल्हा स्पोर्ट कॉन्सिल तॉयक्वांदो असोसिएशन सोलापूरच्या वतीने सोलापूर आणि जिल्ह्यातील पत्रकार दिनानिमित्त पत्रकाराचा पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीचे अध्यक्ष लायन मोहन भुमकर यांनी घंटा नाद केला.सुरुवातीस दिपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आला. लायन मोहन भुमकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून पाहुण्यांचे सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर लायन एम के पाटील.प्रांतपाल ३२३४ डी – १ प्रकाश हत्ती संचालक सिध्देश्वर सहकारी बॅक,सोलापूर. प्रल्हाद कासिद समाजसेवक व उद्योजक श्री राजू राठी.

चेंबर ऑफ कॉमर्स सोलापूर,लायन मोहन भुमकरअध्यक्ष लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी लायन सोमशेखर भोगडे, राजश्री तडकासे यांची उपस्थिती होती. पुरस्कार प्राप्त पत्रकार हरिश्चंद्र कदम – दै. संचार, श्रीनिवास दासरी -दै दिव्य मराठी, आरती सचिन कुसेकर – दै.तरूण भारत , प्रशांत माळवदे – तेज न्यूज, बाळकृष्ण मोगलप्पा दोड्डी वरिष्ठ उपसंपादक, दैनिक लोकमत, सोलापूर गोपाळ मुदिडिडी न्यूज चॅनल यांना मान्यवरांच्या हस्तेस्मृतिचिन्ह,शाल,मोत्याची माळ, बुके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी पुरस्कारास उत्तर बाळकृष्ण दोड्डी दिले. प्रमुख पाहुणे प्रल्हाद कासिद यांनी पुरस्कार प्राप्त आणि पक्षी निरीक्षणावर विचार मांडले आणि क्लबचे या उपक्रमाला शुभेच्छा देऊन कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतपाल एम.जे.एफ. लायन मल्लीनाथ पाटील पुरस्कार प्राप्त पत्रकार आणि क्लबचे अध्यक्ष लायन मोहन भुमकर यांचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थिती सत्यनारायण पसनूर वकील, रामचंद् म्हेत्रस , मुरलीधर आरकल, राहुल भुमकर, मोहन ताठी, शंकर कणकी, नागेश कंन्ना, नर्सप्पा इंदापुरे, विजय श्रिगिरी, सुरेश श्रीगिरी, बाबु चव्हाण, पुरशोत्तम दुस्सा, मिलिंद बोमडयाल, सुनील पत्तेवार. माणिक भुमकर उपस्थित होते . शेवटी आभार प्रदर्शन सोमशेखर भोगडे यांनी केले तर सुत्रसंचलन श्रीदेवी यळमेली यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here