Home चंद्रपूर पेलोरा येथे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा समारोप

पेलोरा येथे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा समारोप

223

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.10जानेवारी):-राजुरा तालुक्यातील पेलोरा येथे ज्ञानेश्वरी पारायण व ग्रामगीता वाचन सप्ताहाचा समारोप शेकडो भाविकांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. संत बाजीराव महाराज देवस्थान, दत्त मंदिर आणि समस्त ग्रामस्थांच्या मदतीने गेल्या २६ वर्षांपासून नववर्षाच्या प्रारंभी हा सप्ताह सुरू होतो.

समारोपाच्या प्रसंगी आम. देवराव भोंगळे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कीर्तनकार माणिक रोकडे महाराज, मुख्य संयोजक धनराज पाटील लांडे, सरपंच सौ. अरूणा झाडे, पोलिस पाटील सौ. माधुरी खुजे आदींची उपस्थिती होती.
यावेळी संत साहित्य आणि ग्राम जीवन या अनुषंगाने आ. देवराव भोंगळे, बंडोपंत बोढेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. तर सप्ताहाचा आढावा धनराज पा. लांडे यांनी घेतला. देवस्थान च्या वतीने यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या तसेच विशेष सहयोग देणा-या व्यक्तींना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

सकाळी रामधून दिंडी वाजतगाजत गावातून काढण्यात आली. त्यात परिसरातील १४ भजनी मंडळे सहभागी झाले होते. तेलंगण स्टेट, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील भाविक वृंद यावेळी मोठ्या प्रमाणात आले होते.एकंदरीत सप्ताहाच्या आयोजनासाठी गिरीश पानघाटे, सचिन पानघाटे ,विठ्ठल दाते, केशव अडबाले ,उत्तम लांडे, रामचंद्र राजुरकर, आनंद वांढरे, साईनाथ बोंडे, दिनकर बोढेकर, तंमुस अध्यक्ष देवकाबाई डेरकर तसेच गावातील युवा वर्ग, भजनी मंडळ, ग्रामपंचायत , सर्व महिला मंडळे यांनी अथक परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here