Home महाराष्ट्र पत्रकार दिनानिमित्त व्हाईस ऑफ मीडिया तर्फे भोजनदान व फळ वितरण

पत्रकार दिनानिमित्त व्हाईस ऑफ मीडिया तर्फे भोजनदान व फळ वितरण

107

✒️बल्लारपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बल्लारपूर(दि.7जानेवारी):-पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्हाईस ऑफ मीडिया मुंबई शाखा बल्लारपूर तर्फे दिनांक 7 जानेवारीला सकाळी 11.00 वाजता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा कार्यवाहक गणेश रहिकवार व माजी नप उपाध्यक्ष सिक्की यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला तसेच विसापूर येथील वृद्धाश्रम येथे वृद्धांना भोजनदान करण्यात आले.

यावेळी व्हाईस ऑफ मिडियाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष शंकर महाकाली , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दोतपेल्ली व मराठी पत्रकार संघ बल्लारपूर तालुका अध्यक्ष रमेश निषाद यांचे प्रमुख उपस्थितीत भोजनदान कार्यक्रम पार पडला.

यावेळी व्हाईस ऑफ मीडिया चे पत्रकार तालुका संगठक विकास दुपारे,सचिव प्रेम गहलोत ,उपाध्यक्ष ताहीर शेख , व्हॉईस ऑफ मीडिया सदस्य चेतन गेडाम, डॉ.राकेश कांबळे,राजेश गेडाम, सामाजिक कार्यकर्ता नहीम भाई, नंदू तीलोकानी, माजी नगसेवक विनोद आत्रम,रोहन कळसकर,शांतिकुमार गिरमिल्ला, संतोष बरसागडे, तसेच सामाजिक उपस्थित होते।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here