


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.4जानेवारी):-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सोबत स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य जगातील तमाम स्त्रियांसाठी प्रेरणास्तोत्र आहे फुले दाम्पत्यांचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्य आज शेकडो वर्षे झाली तरी स्त्रियासाठी ऊर्जा देणारे असेच आहे असे मत म्हसवड येथे बोलताना सामाजिक कार्यकर्ते बापू कबीर यांनी व्यक्त केले.
म्हसवड येथे संत सावता माळी मंदिर येथे सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते ते म्हणाले महात्मा फुले आणि सावित्रीमाई जरी माळी समाजातील असले तरी त्यांनी कोणतीही जातपात न पाहता सर्व जाती धर्मातील स्त्रियांना शिक्षण कसे घेता येईल आणि शिक्षण घेऊन त्या सक्षम कशा होतील हे पाहिले त्यासाठी त्यांनी घरातल्याबरोबर समाजातील लोकांशीही संघर्ष केला वेळप्रसंगी त्यांनी शेणाचे गोळे, चिखल स्वतःच्या अंगावर मारून घेतला पण एवढे अपमाणीत हाऊन सुद्धा त्या मागे हटल्या नाहीत त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले आज ज्या महिला देशातील. विविध ठिकाणी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि समाजात मानाने जगत आहेत हि देण केवळ फुले दाम्पत्यांमुळेच आहे आज सावित्रीमाई ची जयंती साजरी करताना विशेष आनंद होत आहे.
यावेळी अभिवादन करणेसाठी मनोज कवी, सुनील पतंगे,बाळू पिसे, राजकुमार कवी,भिकू ढाले, महादेव कवी,सागर ढाले,सुनील ढाले, सतीश ढाले,हर्षद पिसे, प्रकाश पिसे, अनंत पिसे,भावेश नागणे, कुंदन पिसे,पंकज केवटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.














