Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल धरणगाव महिला मुक्ती दिन साजरा !

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव महिला मुक्ती दिन साजरा !

146

▪️क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण !

▪️सौ ललिता राजेंद्र वाघ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान !

▪️सावित्रीमाईंचे कार्य अखंड देशासाठी प्रेरणादायी – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.3जानेवारी):-शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मोत्सवानिमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन व महिला मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोबतच क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एन कोळी यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सौ ललिता वाघ, मंगलादेवी व मुन्नादेवी फाउंडेशनचे संचालक मुकेश बयस , शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे असते सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले व सत्यशोधिका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आलेल्या मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मान्यवरांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाच्या विजेत्या संघांना व विजेता खेळाडूंना सन्मानचिन्ह, ट्रॉफी, मेडल, प्रशस्तीपत्र देण्यात आले. यानंतर सावित्री शक्तीपीठ पुणे या सामाजिक संघटनेच्या वतीने सत्यशोधिका ललिता वाघ यांना “सावित्रीबाई फुले पुरस्कार ” देण्यात आला त्यांचा शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक व्ही टी माळी, आबासाहेब राजेंद्र वाघ व लक्ष्मणराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व सावित्रीमाई फुले यांचे सामाजिक – शैक्षणिक कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम के कापड या कापडणे यांनी सावित्रीबाईंमुळेच आम्ही गावाच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलो आहेत असे प्रतिपादन करून माईंचा विचार आत्मसात करण्याचा संदेश दिला.

समारोपाप्रसंगी मुकेश बयस यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट अल्पोहार म्हणून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस एन कोळी तर आभार एस व्ही आढावे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक एच डी माळी, एम बी मोरे,पी डी पाटील व सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here