Home महाराष्ट्र कानगाव जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कानगाव जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

106

दौंड – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात “बालिका दिन” जि प प्राथ शाळा कानगाव तालुका दौंड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषा सर्वांचे आकर्षण ठरल्या.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कोरहाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अनेक विदयार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा दिला. सौ संध्या कुंभार मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. श्री श्याम ठाणेदार सर, श्री एकनाथ हराळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र जगताप सर यांनी केले तर सहशिक्षिका शोभा कोष्टी यांनी आभार मानले. यावेळी प्रकाश लकडे सर, सखाराम खोमणे सर, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here