▪️श्री हनुमान देवस्थानात पूजाअर्चा करीत केली आरती
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.2डिसेंबर):-मुचेपार येथील जागृत हनुमान देवस्थान येथे पुजाअर्चना करीत राज्याचे नवीन मंत्रीमंडळात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना मंत्रीपद स्थान मिळण्यासाठी मनोकामना करीत भाजप भिसी पदाधिकारी यांनी साकडे घातले.आमदार बंटीभाऊ भांगडिया तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल भक्तीमय दर्शन घेण्यात आले.मुचेपार हे स्थळ चंद्रपूर नागपूर जिल्हा सिमेवरीत जंगलात असून भिवापूर तालुक्यात आहे. भाजप महिला आघाडी भिसी ने कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, मनोहर मुंगले, गोपाल बलदुवा, निलेश गभणे, पंकज गाडीवार, किशोर मुंगले, प्रफुल कोलते, बंडूभाऊ जावळेकर, किशोर नेरलावार, राजू बानकर, विनोद खवसे, लीलाधर बनसोड, अतुल पारवे, पंकज मिश्रा, अतुल पडोळे, विनोद खेडकर पंकज देवतळे, उमेश मुंगले, सुभाष केमये, सौ वैशाली बलदुवा, सौ मंजुश्री मुंगले, सौ मंजुषा ठोबरे, सौ दीपाली बानकर, सौ रंजना खेडकर, सौ योगिता गोहणे, सौ दीपाली नेरलावार, काकपुरे मॅडम, सौ स्वाती मुंगले, श्रीमती पार्वता गभणे, सौ साधना मुंगले, सौ योगिता पाटील यांचेसह भिसी येथील महिला पदाधिकारी उपस्थित होते.