Home चंद्रपूर अरुणा काकडेचे अपहरण की घातपात-पाच दिवसानंतरही शोध लागला नाही

अरुणा काकडेचे अपहरण की घातपात-पाच दिवसानंतरही शोध लागला नाही

476

▪️चिमूर व्यापारी असोशीयशनचे पोलिस निरीक्षकाचे निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.2डिसेंबर):- व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे पाच दिवसापासून बेपत्ता असून अरूणाचे अपहरण आहे की घातपात यांचा तातडीने शोध घेण्याबाबत व्यापारी असोशीयशन चिमूर कडून पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे चौकशीची मागणी करण्यात आली.

व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे =वय अंदाजे 37 वर्ष ) ह्या दिनांक 26 नोव्हेबर 2024 रोज मंगळवार ला नेहमीप्रमाणे सकाळी चिमूर नागपुर बसने नागपुर येथे दुकानातील सामान खरेदी करिता नागपुर येथील ईतवारी मार्केट मध्ये गेल्या होत्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे असे कळले की अरुणा अभय काकडे ह्या सकाळी चिमुर येथून नागपुर बस स्टैंड ला पोहोचल्या नंतर तिथून ऑटो ने तीन नल चौक, ईतवारी येथे पोहोचलया त्यानंतर त्या ईतवारी भंडारा रोड येथील बाटा शोरूम समोरून त्या हरवलेल्या आहेत.

दिनक 26 नोवेंबर पासून सौ. अरुणा अभय काकडे यांच्या आप्त-स्वकीयांनी शोध घेऊन त्यांचा ठावठिकाणा न लागल्यामुळे पोलिस तक्रार दाखल केलेली आहे.
सदर घटना घडून आजपावेतो 5 दिवस होऊन सुद्धा अरुणा अभय काकडे यांचा पत्ता न लागल्‌यामुळे अपहरण कि घातपात होण्याची संभावना आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सौ अरुणा अभय काकडे यांच्या शोध घेण्यात यावा या करिता पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांना निवेदन देण्यात आले.यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, सचिव बबन बनसोड, प्रशांत गगपल्लीवर, घनश्याम चांदेकर, अभय धोपटे, आशिष असावा, विनोद शर्मा, ॲडव्होकेट लांबट उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here