Home चंद्रपूर ब्रम्हपुरी मतदारसंघात विजयाचा जल्लोष, वडेट्टीवारानी पुन्हा आपला गड राखला

ब्रम्हपुरी मतदारसंघात विजयाचा जल्लोष, वडेट्टीवारानी पुन्हा आपला गड राखला

532

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.23नोव्हेंबर):- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख निश्चित होताच सर्व पक्षातील उमेदवार व पार्टी जोरात कामात लागले. परंतु ब्रम्हपुरी मतदारसंघात सर्व जनतेचे लक्ष वेधले होते. मोठे नेते म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस विपक्ष नेते मा. विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात कुणबी समाजाचे क्रीष्णलाल सहारे यांना भाजप कडून उमेदवारी मिळाली होती. ब्रम्हपुरी मतदारसंघात कुनबी समाजाची लॉबी जास्त असल्याने क्रीष्णलाल सहारे यांच्या नावावर विजयाचा शिक्कमोर्तब होईल बोल्याचे जात होते.

परंतु मा. विजय वडेट्टीवार यांनी कोणत्याही अफवांना न जुमानता आपला गड राखून 13971 मतांनी विजयी उमेदवार म्हणून हॅट्रिक मिळवली. कुणबी समाज एकवटल्यामुळे जनतेमध्ये क्रीष्णलाल सहारे जिंकून येथील असे चर्चेला उधाण आले होते. परंतु राजकारणातील सिकंदर समजले जाणारे काँग्रेस चे विपक्ष नेता मा. विजय वडेट्टीवार यांच्या विजयाने पुन्हा एकदा ब्रम्हपुरी मतदारसंघ जल्लोषात दुमदुमली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here