


चिमूर
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून कवडशी (देश ) येथील दामोदर नन्नावरे यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह स्वगृही भाजपात प्रवेश केला.
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दामोदर नन्नावरे व सहकारी कार्यकर्त्यांना पुन्हा नव्या दमाने काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या.
ग्रामपंचायत सदस्य दामोदर नन्नावरे, मारोती जिवतोडे, चरण नन्नावरे, प्रशांत नन्नावरे, आकाश गजभे, अशोक गजभे, प्रमोद गाडगे, विशाल नन्नावरे यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, जिप क्षेत्र प्रमुख अविनाश बारोकर, सावन गाडगे उपस्थित होते.














