Home महाराष्ट्र छावाचे जिल्हाध्यक्ष अजय भिसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोटो जाळली

छावाचे जिल्हाध्यक्ष अजय भिसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोटो जाळली

201

 

अनिल साळवे (परभणी जिल्हा प्रतिनिधी) मो. 86985 66515

गंगाखेड -अखिल भारतीय छावा संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष यांच्यावतीने गोदावरी नदीच्या काठावर गंगाखेड स्मशानभूमी मध्ये दि 27 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोची चिता करुन पेटवली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून असे म्हणाले परंतु आरक्षण दिले नाही. याचा निषेध नोंदवीत गंगाखेडच्या स्मशानभूमीत आगळ्यावेगळ्या आंदोलन करून छावाचे जिल्हाध्यक्ष अजय भिसे यांनी बॅनर असलेला फोटो चक्क शरणावर रचून पेटवून दिला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायम आंदोलन करणार असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा छावा संघटनेच्या वतीने आंदोलने चालूच ठेवणार असल्याची भूमिका यावेळी अजय भिसे यांनी घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here