


✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड :- (दिनांक 26 ऑक्टोंबर) उमरखेड विधानसभा मध्ये मागील दोन ते अडीच वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून एन्ट्री करणारे, गोरगरिबाला मदत करणारे उच्चशिक्षित साहेबराव कांबळे यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमरखेड विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बौध्द समाजाच्या साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिल्यामुळे बौद्ध समाजामध्ये उत्स्फूर्त व नवा दिवस निर्माण झालेला दिसत आहे. आणि
पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही नवा जोश निर्माण झालेला दिसत आहे.
सर्व स्तरावरून तिकीट मिळाल्यामुळे साहेबराव कांबळे त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि अभिनंदनचा वर्षाव होताना मतदार संघात दिसत आहे.














