



रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर: आशा गट प्रवर्तक अतीशय चांगले काम करत आहेत. काही मागण्या पूर्ण जाल्यात मात्र आशा गट प्रवर्तकना शासकिय कर्मचारी दर्जा दिला पाहिजे. भाऊबीज मिळाली पाहिजे. या साठी विधान सभेत आवाज उठवणार असे आश्वासन आमदार सुधाकर अडबाले यांनी आयटक चंद्रपूर आशा गट प्रवर्तक विजयी निर्धार मेळाव्यात प्रमूख पाहुणे म्हणुन मार्गदर्शन करतांना केले. आयटक , लाल बावटा हातात घेऊन कॉ. ए बी बर्धन जन्मशताब्दी वर्ष आहे. हाच वारसा घेऊन तुम्हीं लढत आहात. याचा अभीमान वाटतो. लाढल्या बहिणी काम करणाऱ्या बहिणी नाहीत का?? त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा दिला पाहिजे असे आवाहन केले.
मेळाव्याचे अध्यक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेते कॉ. महेश कोपुलवर होते. उद्घाटन आयटक राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे होतें, आशा गट प्रवर्तक संघटना राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. मंगल पांडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले ,सामाजिक कार्यकर्ते किशोर पोतनवार,नाट्य कलावंत तथा गाहिका निषाताई धोंगडे होतें.
उद्घाटन करताना कॉ. श्याम काळे यांनी आशा गट प्रवर्तक लढ्याचा आढावा घेतला. आयटक न 2009 पासुन संघर्ष करतं आहे. या देशातील आयटक पहिली संघटना आहे. यात देशातील आशा गट प्रवर्तक सह दिड कोटी सभासद आहेत. या संघटनेची आपणं जोडले आहात. याचा अभीमान वाटला पाहिजे. देशातील कामगार कर्मचारी , योजना कर्मचारी ना न्याय मिळवून दिला आहे. आशा गट प्रवर्तक सुद्धा न्याय मिळवून देणार आहोत. असे प्रतिपादन काळे यांनी केले.
प्रमूख मार्गदर्शन करताना राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक आयटक यांनी आशा गट प्रवर्तक नी वर्ष भर रस्त्यांवर उतरून आंदोलन केले. ऊन वारा पाऊस सहन केला. सरकार ने परीक्षा पाहिली. मात्र आयटक व कृती समिती ने 3 महिने संप करून विजय मिळवला आहे. मात्र दिलेलं आशा ना 7 हजार व गट प्रवर्तक ना 10 हजार रुपये वाढ व दिपावली सानुग्रह अनुदान व गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा देण्याचे लेखी आश्वासन आरोग्यमंत्री यांनी दीले होतें. मात्र ते पुर्ण पाळले नाही व अथग संघर्ष करून 5 हजार वाढ केली आहे. मात्र उर्वरित मागणी बाकी आहेत. राहिलेल्या मागण्यांसाठी आयटक संघर्ष करेल. आशा ना 5 हजार वाढ झाली आहे. मात्र सप्टेंबर पासून 18 कामावर ते 5 हजार वाढ दिली जाणार आहे. हे 18 निकष आरोग्य अभियान सह संचालक यांनी त्वरीत रद्द केली पाहिजे. व मागील 4 कामावरच वाढीव मोबदला द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहोत. केंद्र सरकार ने 2018 पासुन आशा गट प्रवर्तक ना एक रुपया वाढ दिलेली नाही. त्यामूळे केंद्र सरकार विरोधात तीव्र लढण्याचा निर्धार आज च्या मेळाव्यात करत आहोत. जे मिळाले ते घेऊ या या पुढील काळात आशा गट प्रवर्तक ना पेंशन व सामजिक सुरक्षा मिळवण्यासाठी , शासकीय कर्मचारी दर्जा मिळवण्यासाठी लढा देउ या. आशा गट प्रवर्तक लढा यशस्वी करण्यासाठी कॉ. विनोद झोडगे यांनी 35 दिवस मुंबईत होते. त्यांचा आज सत्कार करतांना आनंद होत आहे.
कार्यक्रम चे अध्यक्ष डॉ महेश कोपूलवार यांनी यानी लढणाऱ्या आशा गट प्रवर्तक चे अभिनंदन केले. या पुढील काळात आशा गट प्रवर्तक ना किमान वेतन व पेंशन साठी लढा तीव्र करावा. तसेच शेतकरी कष्टकरी चळवळ बळकट करावी असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेते कार्यक्रम अध्यक्ष महेश कोपुळवार यांनी केले या प्रसंगी राष्ट्रीय आशा गट प्रवर्तक संघटना अध्यक्षा मंगल पांडे यांनी या पुढील काळात दिल्लीत तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला. कॉ. विनोद झोडगे राज्य उपाध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले.या प्रसंगी , एन टी म्हस्के,प्रकाश वानखेडे, रवींद्र उमाटे, अशोक म्हस्के, डॉ नैना उत्तरवर, आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रकाश रेड्डी, राजु गैनवार,प्रदीप चीताडे, निकिता निर, सुहासिनी वाकडे, वर्षा घुमे, जोत्सणा ठोंबरे सविता गटलेवर, ममता भिमटे, सुनंदा मुलमुले यांनी केले.
या विजयी मेळाव्याला जिल्हाभरातून हजारो संख्येने आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते.















