Home विदर्भ आगामी भंडारा-पवनी विधानसभा निवडणुकीत पूजा ठवकर यांचा जनतेकडून उमेदवारीसाठी कौल!जिल्ह्यातून महिला उमेदवार...

आगामी भंडारा-पवनी विधानसभा निवडणुकीत पूजा ठवकर यांचा जनतेकडून उमेदवारीसाठी कौल!जिल्ह्यातून महिला उमेदवार अजूनपर्यंत नाही, जनतेकडून महिला उमेदवाराला पसंती

322

 

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 8888628986

 

भंडारा:- अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे सर्वत्र मानले जात असताना ही निवडणूक दिवाळीनंतरच होईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवाराला घवघवीत मते घेऊन यश संपादन करता आले. भंडारा नागरिकांनी काँग्रेसला पहिली पसंती दर्शविली त्यामुळे येणाऱ्या आगामी भंडारा – पवनी विधानसभा निवडणुकीत पूजा ठवकर यांचा जनतेकडून उमेदवारीसाठी कौल दिसून येत आहे. महिला उमेदवार ही भंडारा – पवनी विधानसभा क्षेत्रात पहिलीच उमेदवार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता बघायला मिळत आहे.
——————————–

*उमेदवारी मिळाल्यास विकासकामाकडे लक्ष*

आरोग्य, शिक्षण, स्थानिक रोजगार, बेरोजगार, महिला सुरक्षा याकडे जाणीवपूर्वक लक्ष देवून कामे करणार.
______________________

*शिक्षण व कामे*
पुजा गणेश (बालु) ठवकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. याचं शिक्षण पदवी असून सामाजिक कार्यात नेहमीच सहभागी होतात. भंडारा – पवनी मार्गासाठी आंदोलन, आंभोरा पुल आंदोलन, पेटीवाटप आंदोलन व इतर सामाजिक कार्यात पूजा ठवकर यांचा सक्रिय सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here