


अहमदनगर (प्रतिनिधी): शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य आयोजित पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या
स्मरणिकेचे प्रकाशन बुधवार दिनांक १७ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वा. कोहिनूर मंगल कार्यालय अहमदनगर येथे अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.
या स्मरणिकामध्ये गेल्या दोन वर्षातील कार्यवृत्तांत,शाखांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती व पंधराव्या शब्दगंध साहित्य संमेलनाची क्षणचित्रे प्रकाशित करण्यात आलेले आहेत.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, राज्य मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलूरकर , माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव देवढे, हिंदू सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.मधुसूदन मुळे, सारडा महाविद्यालयाच्या
प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित, शब्दगंध चे सल्लागार प्राचार्य डॉ. जी.पी.ढाकणे,प्राचार्य चंद्रकांत भोसले,बापूसाहेब भोसले, ज्ञानदेव पांडुळे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजान, महानगर शाखा नाट्य परिषदेचे प्रसाद बेडेकर, अहमदनगर नाट्य परिषदेचे अमोल खोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, उपाध्यक्ष भारत गाडेकर, डॉ. गुंफा कोकाटे,कार्यवाहक सुभाष सोनवणे, अजयकुमार पवार,डॉ.तुकाराम गोंदकर, सुनील धस, राजेंद्र फंड,राजेंद्र चोभे,शर्मिला गोसावी,किशोर डोंगरे, रामकिसन माने,बबनराव गिरी, स्वाती ठुबे, राजेंद्र पवार,
हरिभाऊ नजन,शेवगाव, डॉ.संजय दवंगे,कोपरगाव,डॉ. किशोर धनवडे,नेवासा,डॉ.अनिल पानखडे,पाथर्डी,जयश्री इंगळे, राहुरी,लेविन भोसले,श्रीरामपूर यांनी केले आहे.













