


चिमूर – टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष पैलवान वस्ताद जालिंदर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने हनुमान मंदिर नेहरू चौक चिमूर येथे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो नागरिकांनी तपासणी करून घेतली.
टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांचे मार्गदर्शनात पैलवान वस्ताद जालिंदर जाधव यांचे वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने येस हॉस्पिटल नागपूर व रेनबो ब्लड बँक नागपूर यांच्या सहकार्याने हनुमान मंदिर, नेहरू चौक चिमूर येथे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे अध्यक्षस्थानी टायगर ग्रुप वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील मांगरुळकर, उद्घाटक वरोरा तालुका अध्यक्ष रीषभ रट्टे, तर प्रमुख अतिथी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा सरचिटणीस श्रीहरी सातपुते, दिव्यवंदना फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर, शंकरपुर ग्राम पंचायत सरपंच साईश वारजूकर, म्हसली ग्राम पंचायत सरपंच संकेत सोनवाने, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आरोग्य शिबिरात १५० रुग्णांनी तपासणी केली व रक्तदान शिबिरात ९१ रक्तदात्यानी रक्तदान केले.
आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी टायगर ग्रुप शहर अध्यक्ष रोहन नन्नावरे, भिसी शहर अध्यक्ष अक्षय नागपुरे, उपाध्यक्ष विकास जांभूडे, कार्याध्यक्ष विशाल शेंडे, पवन झाडे, विशाल शिवरकर, निखिल गिरी, पवन डोंगरवार, सौरभ चटपकार, अक्षय इटणकर, कुणाल खिरटकर, सुदर्शन मडावी, शुभम मांढरे यांनी अथक परिश्रम घेतले













