Home महाराष्ट्र कलियुगात माणूसकी विसरले लोक..!  मृतक वयोवृद्धाला अंतिम कापड देत फ्रिडमची श्रद्धांजली...

कलियुगात माणूसकी विसरले लोक..!  मृतक वयोवृद्धाला अंतिम कापड देत फ्रिडमची श्रद्धांजली •  ये जा करणारे लोकही विसरले माणूसकी ; ओळख पटविण्यासाठी पोलीसांचे आवाहन •

491

 

साकोली : एक वयोवृद्ध साकोली न्यायालय गेटसमोरच मृत अवस्थेत पडले होते. तेथून ये जा करणारे लोकही वाकड्या तोंडाने तोंडावर रूमाल ठेवून पाहून न पाहिल्या सारखे करीत निघून जात होते. हे आजच्या कलियुगातातील महान नागरिक आहेत की ज्यांनी माणूसकी विसरून असा अमानूषपणा या दूनियेत दाखवित आहेत. पण ते दृष्य फ्रिडमला पहाविले नाही आणि निर्वस्त्र असलेल्या वयोवृद्धाच्या अंगावर कापड घालण्याचे सौभाग्य आणि माणूसकी कमविली आहे फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे यांनी.
📕 घटना शुक्रवार २४ मे दू. १२ च्या सुमारास साकोली न्यायालय गेटसमोरच अनोळखी मृतक वयोवृद्ध पडले होते. तेथून शेकडो नागरिक, न्यायालयातील वकील मंडळी ये जा करीत होते पण थोडे थांबून ही व्यक्ती कोण.? याची माहिती पोलिसांना किंवा रूग्णालयाला आहे काय.? यात आपले तर कुणी परीचीत हे वृध्द नाहीत.? हे दोन सेकंदही थांबून विचारण्याचे धाडस व हिंमत या कलियुगातील मानवाने दाखविले नाही तर यालाच म्हणतात कलियुगातील असे काही मतलबी अमानुष. पण तेथून फ्रिडमचे किशोर बावणे जातांना हे दृष्य पाहताच त्यांचे मन हळहळले आणि तातडीने एक नविन कापड आणून त्या मृत शरीरावर ओढले. तातडीने पोलीस नायक नवनीत जांभूळकर यांना ही कल्पना दिली. त्यांनी किशोर बावणे यांच्या मदतीने ते अनोळखी वयोवृद्धाचे शव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणून या कलियुगात दोघांनी एक माणूसकीचा परीचय दिला आहे आणि एक अनोळखी वृद्धाच्या अंतीम क्षणाला त्यांवर वस्त्र परिधान करण्याचेही सौभाग्य प्राप्त केले हे स्तुतीमय. पोलीस नायक नवनीत जांभूळकर यांनी साकोली मिडीयाच्या समुहातून सदर वयोवृध्द नागरीकाची ओळख पटविण्यासाठी सदर इसम हे अंदाजे ७० वर्षाचे असून फोटोमधील वर्णन पाहून साकोली पोलीस हेल्पलाईन ०७१८६ – २३६१३३ यावर त्यांचा कुटुंबीयांनी अथवा परीचीतांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here