Home महाराष्ट्र भिख्खू संघाच्या त्यागातून बौद्ध धर्म जगात अजरामर आहे : जयसिंग वाघ

भिख्खू संघाच्या त्यागातून बौद्ध धर्म जगात अजरामर आहे : जयसिंग वाघ

240

भुसावळ :- बुद्ध काळापासून भिख्खू संघ बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणात संघर्ष करीत आला आहे , प्रसंगी भिख्खूने आपले मरण स्वीकारले मात्र आपली निष्ठा कायम ठेवली , त्या मुळेच आज जगभरात बौद्ध धर्म अजरामर आहे .असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले .पुढं आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी सांगितले की , आज भारतात बौद्ध अनुयायी संघ , कमळ , भगवा या शब्दांचा उच्चार करावयास सुध्दा घाबरतात , कोणी या शब्दांचा वापर केल्यास त्यावर टीका टिप्पणी केली जाते , बौद्ध जनतेच्या अस्मितेचे हे शब्द , प्रतीके आज बौद्ध धर्माच्या विरोधकांच्या अस्मितेचे झाले आहेत मात्र हे सर्व बौध्द धर्माची देण आहे .
२१मे रोजी भुसावळ येथील तक्षशिला नगर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून भाषण करताना वाघ बोलत होते
वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की , बौद्ध धर्मात श्रामणेर वर्गाचे मोठे योगदान राहिलेले आहे गौतम बुद्ध यांचा मुलगा राहुल वयाच्या सातव्या वर्षी श्रामणेर तर विशाखा सुध्दा सातव्या वर्षी तिच्या शेकडो मैत्रिणी सोबत श्रामणेरी झाली तिच्या या कार्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला भिख्खू संघात सामील झाल्या व त्यांनी नवा इतिहास रचला मात्र अलीकडे महिलावर्ग धम्म प्रचारार्थ अत्यल्प प्रमाणात पुढं येत आहेत या बद्दल जयसिंग वाघ यांनी खंत व्यक्त केली.
सुरवातीस श्रामणेर शिबिरात सहभागी ३६ श्रामणेरांची परिसरातून भव्य धम्म फेरी काढण्यात आली त्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला , भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली .
अध्यक्षस्थानी मुंबई. येथील भंतेजी दिपंकर होते त्यांनी त्रिसरण , पंचशील घेतले , त्यांनी आशिर्वादगाथा द्वारे सर्वांना आशीर्वाद देवून मंगल कामना केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमंगल अहिरे यांनी , प्रास्ताविक प्रकाश सरदार , आभार प्रदर्शन विजय अवसरमल, स्वागत संघरत्न दामोदरे , युवराज नरवाडे, विवेक नरवाडे , परिचय रमेश सावळे , एस. पी. जोहरे यांनी केले . कार्यक्रमाचे आयोजन दिपरत्न तायडे , आश्र्विनी तायडे यांनी केले होते .कार्यक्रमास स्त्री – पुरुष मोठ्या संख्येने हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here