Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न

174

कराड : (दि. ८, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मध्ये IQAC व प्रवेश समिती आयोजित शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत “NEP: 2.0 श्रेयांक आराखडा, प्रवेश प्रक्रिया व माहितीपत्रक” या विषयावरिल विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उदघाटन यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे मा. प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार (सचिव, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे उच्च शिक्षण मंडळ) यांच्या शुभहस्ते झाले. तर सदर कार्यशाळेचे अध्यक्षस्थान मा. श्री अरुण पांडुरंग पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे उच्च शिक्षण मंडळ) यांनी भूषविले.
या कार्यशाळेमध्ये प्रनुख साधनव्यक्ती म्हणून मा. डॉ. प्रकाश कुंभार (अधिसभा सदस्य व सदस्य इंग्रजी अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) आणि मा. प्रा. डॉ. केदार मारूलकर (वाणिज्य विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) यांनी उपस्थित राहून नवीन शैक्षणिक धोरणानुसार श्रेयांक आराखडा, विषय निवड, प्रवेश प्रक्रिया व माहितीपत्रक, SEC, OE, AEC, IKS, VSE, OJT, FP आदी शैक्षणिक कोर्स संबंधी बहुमोल मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातून जवळजवळ 140 प्रतिनिधी म्हणून प्राचार्य, प्रवेश समिती निमंत्रक, सदस्य व माहितीपत्रक प्रमुख उपस्थित होते.
या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा.प्रा. (डॉ.) श्रीमती एस. आर. सरोदे यांनी मान्यवर अतिथीचे स्वागत केले. प्रा. डॉ. आर. आर. थोरात यांनी प्रास्ताविक सादर केले. साधन व्यक्ती व प्रमुख मान्यवरांचा परिचय प्रा. डॉ. एम. ए. कदम पाटील यांनी करून दिला. तर प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. एस. पी. पाटील यांनी केले. सदर कार्यशाळेस प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here