Home महाराष्ट्र धरणगाव येथे शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणाचे आयोजन.

धरणगाव येथे शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणाचे आयोजन.

247

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव _ येथील महात्मा फुले विद्यालयात तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांसाठी (इयत्ता ९ वी ते १२ वी) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अन्वये शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षण विभागामार्फत दिनांक ४ मार्च ते ६ मार्च या कालावधीत राबविण्यात येत आहे .
सकाळी ८ ते १ वाजेच्या दरम्यान हे प्रशिक्षण होत आहे. या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा झालेला असून तालुक्यातील उर्वरित सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्यात सहभागी झाले आहेत. गट शिक्षण अधिकारी डॉ भावना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्ग सुरू असून पी आर हायस्कूल चे उपशिक्षक गणेश सिंह सूर्यवंशी,बी आर सी चे तुळशीराम सैंदाणे या प्रशिक्षण वर्गाचे तालुका समन्वयक आहेत.
प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून डी एस वंजारी,जी पी समशेर,के आर तायडे,आर जे पाटील,परवेझ शेख, एस पी साळुंखे,डी के पाटील,तुषार नाईक,सुधीर शिरसाठ,एस एस साळुंखे,पी बी तेली काम करीत आहेत या प्रशिक्षणात कृती संशोधन व नवोपक्रम,व्यवसायिक शिक्षण मार्गदर्शन,आंतर समवाय क्षेत्र, २१ व्यां शतकातील कौशल्य, नवीन शैक्षणिक धोरण २०२०,कुमारवयीन विद्यार्थी समस्या,आय सी टी,प्रभावी नेतृत्व,नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती ,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आदी विषयावर. मार्गदर्शन,चर्चासत्र होत आहेत.प्रशिक्षणाला तालुक्यातील बहुसंख्य शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थित आहेत.
प्रशिक्षण यशस्वीतेसाठी आणि प्रशिक्षणार्थी यांच्या व्यवस्थेसाठी तुळशीराम सैंदाणे, जयदीप पाटील,मंदार चौधरी,अनिल पाटील,दिपक जाधव,श्री लोखंडे आदी परिश्रम घेत आहेत.
तालुक्यातील सेवाज्येष्ट मुख्याध्यापक एम एच चौधरी (बी जे महाजन विद्यालय आनोरे) यांच्यासह काही मुख्याध्यापक यांनी सुद्धा पूर्ण वेळ प्रशिक्षण वर्गात थांबून तज्ञ मार्गदर्शक यांच्याशी संवाद साधत प्रशिक्षण घेतले.

फोटो…धरणगाव ..येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गणेश सिंह सूर्यवंशी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here