


प्रतिनिधी ढाणकी ,राजेश घुगरे
मो.९६३७६८४०२१
ग्राहकांना कुठलाही त्रास होऊ नये, रक्कम त्यांना सुलभरीत्या व पाहिजे तेव्हा कुठल्याही एटीएममधून मिळेल, या हेतूने बँकेने दिलेली एटीएम सेवेला शहरामध्ये सध्या हरताळ फासला आहे. एटीएम केवळ शोभेच्या वस्तू झाल्या असून, ग्राहकांना याचा नाहक त्रास होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शहरात अनेक बँकांच्या एटीएम सेवा सुरू आहेत. मात्र अनेक एटीएम चोवीस तास सुरू दिसत असले तरी नागरिकांना पैसे मिळतीलच असे नाही. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नागरिक मोठ्या आशेने एटीएम केंद्रावर जातात, मशिनमध्ये एटीएम कार्ड टाकतात, किती रक्कम पाहिजे ते टाकतात, कोड टाकल्यानंतर आता पैसे मिळतील, अशी अपेक्षा बाळगून
एटीएममधून पैसा मिळत नाही. पण लोकांच्या सेवेसाठी सरकार ने मोफत ग्राहक सेवा दिले असून सुद्धा एटीएमच्या बाजूला असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रातून एक हजाराला दहा रुपये कमिशन घेऊन संबंधित एजंटकडून ताबडतोब पैसे मिळतात यावर जनता शंका उपस्थित करत आहे .की, काय बँक वाल्यांचा आर्थिक सलोखा आहे की काय? म्हणूनच की काय एटीएम मध्ये पैसे नसतात.पण यांच्या या आर्थिक सलोख्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कधी तांत्रिक अडचणी, तर कधी रक्कम नसल्यामुळे पैसे मिळत नाही.
एस बी आय बँके शाखा ढाणकी कार्यालयात एटीएम सेवा सुरू आहेत. पण अधीकतर एटीएम मध्ये पैसे नसतात आणि एटीएम बँकेत असल्यामुळे बँके बंद झाल्यानंतर एटीएम मशीन चा उपयोग ग्राहकांना करता येत नाही.एटीएम मशीन असून सुद्धा ए टी एम मशीन चा उपयोग ग्राहकांना होत नसून शहरात एटीएम मशीन शोभेच्या वस्तू बनल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांतून व्यक्त होत आहे.













