Home महाराष्ट्र पुणे येथील महात्मा फुले वाड्यात सत्यशोधक समाजाच्या पहिल्या महिला अधिवेशनाच्या निमंत्रण पत्रिकेचे...

पुणे येथील महात्मा फुले वाड्यात सत्यशोधक समाजाच्या पहिल्या महिला अधिवेशनाच्या निमंत्रण पत्रिकेचे विमोचन तसेच प्रचाराचे उद्घाटन !… महाराष्ट्रातील सर्व सत्यशोधकांनी १ मार्च रोजी ” महात्मा फुले वाडा ” पुणे येथे यावे – अरविंद खैरनार.

100

 

प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – दि.१० मार्च, २०२४ रोजी नायगाव (खंडाळा ) येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशनाच्या निमंत्रण पत्रिकेचे विमोचन तसेच उद्घाटन पुणे येथील महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, राष्ट्रपिता, महात्मा जोतिराव फुले वाडा [ गंजपेठ, पुणे ] येथे १ मार्च, २०२४ रोजी सकाळी ११ वा. होणार आहे.
महाराष्ट्रातील तमाम सत्यशोधक बंधू-भगिनींनी या कार्यक्रम पत्रिकेच्या उद्घाटनासाठी यावे असे आवाहन सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार ( छत्रपती संभाजीनगर ) तसेच सत्यशोधक समाज संघाच्या महिला अध्यक्ष वंदनाताई वनकर ( नागपुर ) यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील सर्व सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक यांनी उपस्थित रहावे. सत्यशोधक समाज संघाचे सचिव डॉ. सुरेश झाल्टे, विधीकर्ते – भगवानदादा रोकडे, भीमराव कोथिंबीरे, डॉ.डी बी शेंडे, संजय बाबा करपे, डॉ. दत्ताजीराव जाधव, रूपाली इंगोले, हेमलता भालेराव, उज्वला तांबे, माधुरी खैरनार, वेणु पाटील, रामचंद्र भागवत राजकिशोर तायडे, साळूबा पांडव, पी डी पाटील, विजय लुल्हे, शिवदास महाजन, रमेश वराडे, रघुनाथ राजेंद्र महाजन, सुदर्शन जाधव, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here