Home महाराष्ट्र गंगाखेड काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने हरेगाव येथे घडलेल्या घटनेचा जाहीर...

गंगाखेड काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने हरेगाव येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध

142

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.28ऑगस्ट):-अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपुर तालुक्यातील हरेगांव येथील शुभम मघाडे या बौध्द समाजाच्या तरूणास गावगुंडानी केलेल्या मारहाणीचा जाहिर निषेध करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात बौध्द समाजावरील व ‘दलितांवर अत्याचारात वाढ झाली आहे. अशा घटनेमुळे जातीयवाद्यांचे मनोबल वाढले आहे. सरकार आपले काहीही वाकडे करीत नाही. त्यामुळे हे जातीयवादी बौध्द व दलितांवर अत्याचार करीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे ३ बौध्द अल्पवयीन तरुणांना शेळी व कबुतरे चोरल्याच्या संशयावरून जातीयवाद्यांनी झाडाला उलटे टांगून व अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. त्यापूर्वी त्या जातीयवाद्यांनी या तरूणांची अर्धनग्न धिंड काढली. या जातीयवाद्यांनी त्या तरूणांच्या अंगावर थुकून त्यांच्या तोंडात लघुशंका केली. या जातीयवाद्यांनी या घटनेची व्हिडीओ रेकॉर्डींग करून ती व्हायरल केली.

येवढी संतापजनक घटना घडूनही हे त्रिकूट सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली आहे. जातीयवाद्यांवर कडक शासन करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग डॉ. सिद्धार्थभाऊ हत्तीअंबीरे यांच्या आदेशावरून गंगाखेड कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, तालुका अध्यक्ष तथा कॉंग्रेस ॲट्रोसिटी जिल्हा समन्वयक सुभाष शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शुध्दोधन भालेराव, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुका अध्यक्ष विकास रोडे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष शेख अजू, युवक काँग्रेसचे अमोल कांबळे अजय वावळे सोनू लांडगे, रंजीत साळवे, विश्वंभर साळवे व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here