


घाऊक महागाईचा दर घटुन ४.१२ ऐवढा कमी झाल्याचे वृत्त वाचले. विशेष म्हणजे गेल्या सुमारे आठ वर्षातील हा दर निच्चांकी पातळीवर आहे. जुन महिण्यात खाण्यापिण्याच्या वस्तु, कच्चे तेल, कपडे वगैरे वस्तु स्वस्त झाल्याचे दिसत आहे. इंधन व विजेचे दर सुध्दा १२.६३ टक्यांनी खाली आले आहेत. सर्वात जास्त महागाईचा दर जुन २०२२ मध्ये १५.१८ इतका जास्त होता. घाऊक महागाईचा दर दिर्घकाळ जास्त झाल्यास त्याचा उत्पादन क्षेत्रावर परिणाम होतो.
हे सरकारी आकडे जरी दिसत असले तरीही सामान्य माणुस मात्र महागाईचे ओझे डोक्यावर बाळगुन आहे. कदाचित कपडे स्वस्त झाले असतील पण टमाटर महाग झाले आहेत. गहू, बाजरी तसेच ज्वारी इत्यादी धान्याच्या किमंतीत सुध्दा घट झालेली दिसत नाही. सर्व शैक्षणिक वस्तु तर महागच आहेत. पुस्तकांच्या किमंती वाढलेल्या आहेत. प्रवास खर्च सुध्दा पुर्वीप्रमाणेच वाढलेला आहे. भाजीपाला व फळे सुध्दा महाग आहेत. विशेषतः कोथींबीर (सांबार) चे भाव जास्त आहे. साखर सुध्दा महागली आहे. एकुणच सर्वसाधारणपणे सर्व जीवनाश्यक वस्तु महागच दिसत आहेत, त्यामुळे खरचं महागाई कमी झाली का ? याचा विचार करावा लागेल.
✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर जि. चंद्रपूर)मो:-८६०५२९२८३०













