Home महाराष्ट्र 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यव्यापी व्याख्यानसत्र

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यव्यापी व्याख्यानसत्र

126

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.20जुलै):–भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येत्या 15 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. त्या निमित्ताने त्या दिवसापासून गांधीजींच्या स्मृतिदिनापर्यंत (30 जानेवारी) सहा महिने समाजात वैचारिक घुसळण घडून यावी असा राज्यव्यापी कार्यक्रम पाच संस्थांनी योजला आहे. व्याख्याने मुख्यतः गावोगावची महाविद्यालये आणि ग्रंथालये या ठिकाणी होतील. सहा महिन्यांतील व्याख्यानसत्रात वक्त्यांची व विषयांची जुळवाजुळव होत आहे. आधुनिक काळात तंत्रविज्ञानाने विविध ज्ञानशाखा समाजासमोर खुल्या करून ठेवल्या आहेत. त्या समजावून सांगून विद्यार्थ्यांना/तरुणांना नवीन काळास अभिमुख करणे हा या व्याख्यानांचा व त्यामधून निर्माण होणाऱ्या संभाव्य ज्ञानचर्चांचा/वादविवादांचा हेतू आहे.

या उपक्रमात विविध विद्याशाखांमधील तज्ज्ञांनी वक्ते म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन आहे. विशेषत: निवृत्त जाणकारांना तरुणांशी संवाद साधण्याची ही उत्तम संधी आहे. तसेच, महाविद्यालयांनी व ग्रंथालयांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अशी उत्तमोत्तम भाषणे ठेवावीत, चर्चा आयोजित कराव्यात अशी विनंती आहे.

समन्वयक

अपर्णा महाजन 9822059678 इमेल aparnavm@gmail.com

सुनिल जोशी 9322642360 इमेल ssjoshiassociates@gmail.com

पाच संस्था – थिंक महाराष्ट्र डॉट कॉम- सद्‍भावनेचे व्यासपीठ (मुंबई), सामाजिक संस्था स्वप्नभूमी (केरवाडी- परभणी), विचारवेध (पुणे), ग्रंथालय मित्र मंडळ (ठाणे), आरोग्य भान (पुणे).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here