Home महाराष्ट्र मुंबईच्या राज्यव्यापी महामोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित रहा-पुसद येथील बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या...

मुंबईच्या राज्यव्यापी महामोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित रहा-पुसद येथील बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समस्त कार्यकर्त्यांना आवाहन

163

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16जुलै):- शासकीय विश्रामगृह पुसद येथे वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा पश्चिम विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये यवतमाळ जिल्हा प्रभारी मोहन राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील राज्यातील विविध विषयाच्या अनुषंगाने मुंबई येथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय गायरान, एस आर ए. सामाजिक वनीकरण, रेल्वे कटिंग, वन जमिनी, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, महानगरपालिकेतील झोपडपट्टी धारक जमिनीवरील बेघर, भूमीहीन, शेतमजूर, अतिक्रमण धारकांची घरे, शेती, वाचविण्यासाठी राज्यव्यापी महामोर्चा आंदोलन आयोजित केले आहे तरी समस्त कार्यकर्ता, पदाधिकारी, यांनी मुंबई येथे होणाऱ्या महामोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन सदर बैठकीमध्ये करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीची निर्मिती वंचित, श्रमिक, कामगार, भूमीहिन, शेतकरी, इत्यादींच्या नाय हक्कासाठी तसेच विविध पातळीवर पक्ष आपला लढा नेहमीच आक्रमक पद्धतीने लढत आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे – फडणवीस यांच्या नेतृत्वात जे बेकायदेशीर अस्तित्वात आलेले सरकार व मागील आठवड्यात, ईडी,सीबीआय,चा धाक दाखवून स्वतःला ट्रिपल इंजिन समजणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी मुंबई येथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असून संपूर्ण प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी महामोर्चा आंदोलनाचे आयोजन केले आहे.

या मोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी पुसद येथील शासकीय विश्रामगृह येथील बैठकीत वंचित बहुजन आघाडी, यवतमाळ पश्चिम जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सादर बैठकीला मार्गदर्शन करताना पश्चिम जिल्ह्याचे प्रभारी मोहन राठोड यांनी समस्त वंचिताच्या न्याय हक्कासाठी जो मोर्चा आयोजित केला आहे त्या मोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीचा एल्गार बुलंद करायचा आहे असा संदेश या बैठकीमध्ये समस्त कार्यकर्ता पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना देण्यात आला.तसेच ही बैठक विषयाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून संपन्न झाली.

सदर बैठकीचे अध्यक्ष प्रमोद राऊत, प्रमुख मार्गदर्शक जिल्हा प्रभारी मोहन राठोड, जिल्हा महासचिव डिके दामोदर, शामराव राठोड ,सतीश खाडे ,तातेराव मानकर, पांडुरंग मेश्राम , मौलाना सय्यद हुसेन,उनकेश्वर मेश्राम, सुभाष सावते, बुद्धरत्न भालेराव, जयानंद उबाळे ,प्रसाद खंदारे, राजरत्न लोखंडे, अरुण राऊत, बिशर कुरेशी, मधुकर सोनवणे,संतोष जोगदंडे, अरुण पवार, रामराव बनसोड, अमोल मनवर, संजय मुजमुले, पुरुषोत्तम बोरकर, सुभाष राठोड, एस के मुनेश्वर, प्रकाशराव डोंगरे ,गणेश पाईकराव, किशोर राऊत देवराव खंदारे विष्णू खडसे, मोहम्मद रफीक,इत्यादी सह कार्यकर्ता, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here