Home चंद्रपूर रेती पाहिजे का रेती…? मौजा दाबका हेटी येथे अवैध रेती साठा उपलब्ध.....

रेती पाहिजे का रेती…? मौजा दाबका हेटी येथे अवैध रेती साठा उपलब्ध.. तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही.. पत्रकाराला धमकी..

249

सहसंपादक // उपक्षम रामटेके
📱9890940507
चिमूर तालुका हा नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असून इथे निसर्गाची खूप मोठी देणगी आहे कुठलाही उद्योग जल प्रकल्प नसताना येथील जनता शेतीलाच आपलं सर्वस्व समजून कष्ट करतात इथे भरपूर प्रमाणात नदी आहेत त्यामुळे रेतीचा साठा उपलब्ध आहे त्याच कारणामुळे चिमूर तालुक्यामध्ये अवैध रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात केल्या जाते.
अवैध उत्खनन करणाऱ्या बरोबर येथील प्रशासकीय अधिकारी घनिष्ठ सबंध प्रस्थापित झाल्यामुळे  त्यांना कुठलीही भीती राहिली नाही
चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यात फार मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन चालले, पावसाळ्यात रेतीचा उपसा करता येणार नाही म्हणून त्यांनी अवैध रेतीचा साठा सुद्धा करून ठेवला अवैध रेतीचा साठा मौजा दाबकाहेटी येते असून. तो जास्त किमतीमध्ये विक्री करत आहे.. उन्हाळ्यात अवैध रेती उपसा करणाऱ्या व्यक्तीची  वारंवार तक्रार करून सुद्धा सबंधित अधिकारी यांनी  कुठलीही त्यांच्यावर कारवाई केली नाही.. फोन केले असता संबंधित अधिकारी हे सुट्टीवर असतात हे मात्र विशेष… अशा अधिकाऱ्यांना कायमची सुट्टी देण्याची आवश्यकता आता आहे..
अवैध रेती उपसा करणारे लोक ज्या गावामधून रेती उपसा करतात त्याच गावातील लोकांना मजूर म्हणून ठेवतात त्यामुळे गावातील इतर लोक त्यांना काहीच बोलत नाही त्याचाच फायदा घेऊन हे लोक रेतीचा साठा करतात आणि पावसाळ्यात त्यांची जादा भावाने विक्री करतात.
मोका चौकशी करणाऱ्या पत्रकारांना रेती उपसा करणारा व्यक्ती धमकी देतो आणि म्हणतो तुम्ही आमचे काहीच वाकडे करू शकत नाही.. किती रे त्यांची हिम्मत..?
त्यांना ही हिंमत येते तरी कुठून..? मोजा दाबका हेटी येथे असणारा रेतीचा साठा कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे आणि तो ट्रॅक्टर सुद्धा कोणाचा आहे हे पण सर्वांना माहित आहे आज पर्यंत त्या व्यक्तीवर कुठली कारवाई झाली नाही आणि होणारही नाही हे त्रिकाल सत्य आहे… कारण आम्ही घेतले आहेत ना…?
दाबकाहेटी अवैध रेती साठा असणारा ठेकेदार हा जांभूळघाट येथील असून त्याचं सर्व ओके आहे
कुठेतरी नैतिकता शिल्लक असेल तर आता तरी कारवाई करा ही प्रशासनाला विनंती असणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here