


✒️सातारा, खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
पुसेगाव(दि.13जुलै):- पंचक्रोशीतील वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने मुख्य बाजारपेठ असलेले पुसेगावसह परिसरामध्ये ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून दिवस दिवस वीज पुरवठा खंडित होत आहे. हा वीज पुरवठा सुरळीत व्हावा. यासाठी खटाव महावितरण कार्यालयाल अधिकारी कर्मचारी यांना सातारा जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव आणि सहकारी कार्यकरते यांनी घेराव घातला.
पुसेगाव व परिसरामध्ये गेल्या महिन्यापासून वारंवार वीज पूरवठा खंडित होत असून, ग्रामस्थ तसेच विविध व्यवसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबतसातारा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने अनेक वेळा तोंडी तक्रारी या ठिकाणी केल्या असता, वीज पुरवठ्यामध्ये कुठल्याही प्रकारने सुधारणा करण्यात आली नाही, त्यास अनुसरून येथील जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पुसेगाव महावितरण कार्यालयात खंडित वीजपुरवठ्याबाबत निवेदन देण्यास गेले असता येथील अभियंता व कंत्राटी कामगार यांनी निवेदन घेण्यास नाकारले, येथील कंत्राटी कामगार यांनी उर्मट भाषा वापरून अरेरावी पणा केला.
अशा अरेरावीपणा करणाऱ्या कंत्राटी कामगाराची हकालपट्टी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केले आहे. या ठिकाणी निवेदन घेतल्या न कारणाने भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी संतापाने खटाव येथील उपविभागीय कार्यालयाला घेराव घालून, या ठिकाणी निवेदन घेण्यास भाग पाडले, व येत्या काळामध्ये वीज पुरवठा खंडित न होता सुरळीत वीज द्यावी अशी मागणी करण्यात आली, तशा आशयाचे निवेदन खटाव कार्यालयाला देण्यात आले आहे.यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव, सुशांत गुंजवटे,विजय मोरे, निखिल कोकाटे, पै.राहुल जाधव, रघुनाथ घाडगे, सचिन आवळे, राहुल शिंदे, दीपक फडतरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
*खटाव व परिसरातील वीज कर्मचारी अधिकारी यांच्यावर कोणाचाच अंकुश नाही मनमानी कारभाराला पुसेगाव, खटाव जनता कंटाळली असल्याने अनेक वर्षांपासून यावर ठोस उपाय निघत नाही हे विशेष लाईट जाणार असल्यास शहराप्रमाणे ग्रामीण भागातील प्रत्येक ग्राहकाला त्याचा संदेश जाणे आवश्यक आहे. आज वीज जाणार कोणत्या दिवशी किती तारीख आणि वेळ हे प्रत्येक ग्राहकाच्या मोबाईलवर येणे बंधनकारक केले पाहिजे. जर वीज बिलाचे मेसेज बिल भरा म्हणून येत असतील तर वीज जाणार आहे हा मेसेज सुद्धा ग्राहकांना जावा अशी ही मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तुन होत आहे*













