Home महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

160

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.7जुलै):-वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्यात मागासवर्गीय बौद्ध मुस्लिम, आदिवासी, भटके विमुक्त ,तथा अल्पसंख्यांक घटकावर सातत्याने घडत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आले

या मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये बीड जिल्ह्यातील परळी शहरात पोलीस चौकशी दरम्यान ताब्यात घेतलेल्या 48 वर्षीय जरीन शेख पाटीवाला या मुस्लिम व्यक्तीच्या पोलीस मारहाण दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला त्याची सखोल चौकशी करून पोलीस कर्मचारी यांना बडतर्क करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावामध्ये भीम जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या बौद्ध समाजातील युवक अक्षय भालेराव यांची गावगुंडा च्या वतीने निघून हत्या करण्यात आली त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असे 8 मागण्यांचा समावेश आहे जिल्हाधिकारी भंडारा निवेदन सादर करण्यात आले त्यामध्ये के ए नान्हे ,भगवान बोंडे ,महिला निरीक्षक सुनीता टेंभुर्ण, मुस्ताक पठाण, जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले, महासचिव दिलीप वानखेडे ,जिल्हा संघटक डी जी रंगारी , युवा अध्यक्ष दीपक जंनबंधू, सुरेश खंगार,चरणदास मेश्राम, अड वालदेकर, इत्यादींनी मार्गदर्शन केले व जिल्हाधिकाऱ्यांना नंतर निवेदन देण्यात आले

मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष जगदिश रंगारी, दीपक जंनबंधू, लाखांदूर अध्यक्ष प्रभाकर मेश्राम, मुन्नी शेंडे, धर्मदास भांबोरे ,राधेश्याम कावळे , अमित वैध, गणेश गजभिये, यादोराव गणवीर ,साधना लाडे , रेखा रामटेके, प्रवीण कोचे,अड सुजाता वालदेकर, श्रीकांत नागदेवे, सलाम पठाण, कल्लु बावा, बबलु शेख, एजाज शेख, तैसियेत सय्येड, चंद्रशेखर खोबरागडे, सी डी गवरे ,बहुसंख्य कार्यकर्ते मोर्चा सहभागी झाले होते विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here