Home महाराष्ट्र विजय लुल्हे यांनी लहान माळीवाडा माळी समाज पंचभवन ला १,१११ रु. ची...

विजय लुल्हे यांनी लहान माळीवाडा माळी समाज पंचभवन ला १,१११ रु. ची दिली देणगी !…

135

 

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील

धरणगांव – धरणगाव शहरात लहान माळीवाडा परिसरामध्ये माळी समाज पंचभवनाचे प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे.लहान माळीवाडा परिसरामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक राहतात आणि या सर्वांसाठी माळी समाजाच्या वतीने प्रशस्त तीन मजली इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.या धर्मनिरपेक्ष समाजोन्नतीच्या व्यापक कार्यासाठी माझाही थोडा हातभार लागावा व खारीचा वाटा उचलावा या सामाजिक उत्तरदायित्वातून सुतार समाजाचे सेवानिवृत्त उपशिक्षक,सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक तथा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगाव संस्थापक प्रमुख विजय लुल्हे ( जळगाव ) यांनी पूज्य पिताश्री स्व.सुपडू नथू सुतार [ निवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक ] यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माळी समाज पंचभवन ला १,१११ रुपयाची देणगी रोख स्वरूपात दिली.
याप्रसंगी माळी समाजाचे उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, सचिव दिपक महाजन, कोषाध्यक्ष राजेंद्र महाजन, पंच व नगरसेवक विलास महाजन,लुल्हे सरांचे सन्मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र महाजन [ धानोरा ता.चोपडा ] , तालुका अधिकृत पत्रकार संघाचे अध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ,सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी.डी.पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख आदी मान्यवर समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here