Home महाराष्ट्र स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकाचे प्रकाशन

स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकाचे प्रकाशन

76

गंगाखेड (प्रतिनिधी ) शहरातील यशवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक व लेखक बालासाहेब शिंदे लिखित ‘मानवी आरोग्यशास्त्र’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संपन्न झाला. आरोग्य विभागातील भरतीसाठी परिपूर्ण असे आरोग्य शास्त्राशी संबंधित सर्व माहितीने परिपूर्ण *मानवी आरोग्यशास्त्र* या पुस्तकाचे विमोचन सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोपालदास तापडिया तथा माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी मोहित तापडिया, बालासाहेब सातपुते , सोपान बाबर , संदीप भोसले , झाल्टे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here