Home चंद्रपूर कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्य आंगणवाडी महिलांचा भव्य विभागीय मेळावा

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्य आंगणवाडी महिलांचा भव्य विभागीय मेळावा

143

पंकज रामटेके, विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर-अंगणवाडी महिलांना किमान वेतन लागू करा. सर्वोच्य न्यायालयांच्या निर्णयाची अंमलबजावणी करून अंगणवाडी महिलांना गुज्युएटीचा कायदा लागू करा. सेवा निवृत्त अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा ताबडतोब लाभ द्या. अंगणवाडी महिलांना मानधनाच्या निम्मे पेंशन लागू करा या मागण्या संदर्भात १ में कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्य आंगणवाडी महिलांचा भव्य विभागीय मेळावा राजीव गांधी कामगार भवन चंद्रपूर येथे संपन्न झाला.
या भव्य मेळाव्यात कामगार नेते तथा माजी खासदार मा.श्री नरेशबाबू पुगलिया यांनी प्रख्यात सागरी जलतरण राष्ट्रीय पटू कु. ईश्वरी वाटकर या मुलीला स्व:ता कडुन ११,०००/- (अकरा हजार रुपये )रोख प्रोत्साहन बक्षीष देण्यात आले.
या मेळाव्याला अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे, अखिल भारतीय अंगणवाडी संघटना, नई दिल्ली राष्ट्रीय अध्यक्षा उषारानी, सी. आय.टी.यु. महासचिव शारदाताई लेनगुरे, गॅज्युएटी कायदा तज्ञ, चंद्रपूर श्री किशोर जामदान महासचिव श्री जी रमन्ना, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे मा. नगरसेवक श्री देवेंद्र बेले व श्री पंजाबराव गायकवाड यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here