Home चंद्रपूर नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचा झेंडा…

नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचा झेंडा…

178

 

नागभीड: नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले असून 18 पैकी 14 जागावर विजय मिळवीला आहे.. काँग्रेस ला केवळ चार समाधान
समाधान मानावे लागले आहे.. यात सेवा सहकारी गटात असलेल्या सात जागापैकी सहा जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले या आंनद कोरे,अरुण गायधने,मनोहर चौधरी,गणेश तर्वेकर, अजय देवाडे, अवेशखा पठान विजयी झाले आहेत.. या गटात काँग्रेस चे नरेंद्र हेमणे विजयी झाले असून भाजपचे धनराज बावनकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे…सेवा सहकारी संस्था गटातून संगीता गहाने,नेहा सिद्धमशेट्टीवार यांनी भाजपाकडून विजय मिळवीला त्यांनी काँग्रेस च्या रागिनी गुरुपुडे व आशा गायकवाड यांचा पराभव केला…सेवा संस्था इतर मागास प्रवर्गातून भाजपचे रमेश पाटील बोरकर,तर विशेष मागास प्रवर्गातून चंद्रशेखर विगम हे विजयी झाले, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून भाजपचे राजेश घिये,अनुसूचित जाती जमाती गटातून पंचम खोब्रागडे हे विजयी झाले तर व्यापारी अडते गटातून ज्ञानेश्वर भेंडारकर हे विजयी झाले तर हमाल मापारी गटातून तिसऱ्यांदा भाजपचे धनराज ढोक हे विजयी झाले..काँग्रेस चे हेमंत लांजेवार यांनी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल संगीता विजय मिळविला व्यापारी अडते गटातून काँग्रेस चे अनिल डोर्लीकर यांनी विजय मिळवीला तर ग्रामपंचायत सर्वसाधारन गटातून काँग्रेस चे पुरुषोत्तम बगमारे यांचा केवळ एक मताने विजय झाला… त्यांनी आपले प्रतिस्पर्धी देवानंद बावनकर यांचा केवळ एक मताने पराभव केला…!!!

भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांना चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी अभिनंदन केले…!!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here