Home चंद्रपूर आंबोरकर आणि ढोरे यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी निवडणूकीत सर्वाधिक मतदाराचा...

आंबोरकर आणि ढोरे यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी निवडणूकीत सर्वाधिक मतदाराचा कौल असल्याचे चित्र

222

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी(दि.26 एप्रिल):-
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या 28 एप्रिल 2023 ला रोज शुक्रवारला होऊ घातली आहे. या अनुषंगाने शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारात जवळपास तालुक्यातील सर्वच गावांत मतदारांची सभा माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मा. दिपक भाऊ उराडे, वासूभाऊ सौंदरकर,प्रा.प्रकाश बगमारे, प्राचार्य अरुण शेंडे, डॉ.प्रा. अशोक सालोटकर, डॉ. गोकुल बालपांडे, एड. संजय ठाकरे, संजय बगमारे, रामलाल दोनाडकर, तनय देशकर यांचे सह शेतकरी परिवर्तन पैनलचे सर्व उमेदवार तसेच मतदार बांधव उपस्थित झालेली आहे.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मतदारांनी जागृत होऊन शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराच्या नावासमोर कप बशी या चिन्हावर रबरी फुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
ही सर्व मेहनत बघता ब्रह्मपुरी शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार यशवंत विनायक आंबोरकर आणि योगेश वासुदेवराव ढोरे यांची विजय मताधिक्यांनी विजय होणार असल्याच्या चर्चा सध्या ब्रह्मपुरीत सुरू आहेत.
हे दोन्ही मतदार गट व्यापारी व अडते मतदारसंघातून उभे असून दोघांची घोडदौड सध्या विजयाच्या बाजुनीं सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील सर्वाधिक मतदाराचा कौल सध्या आता या दोघांकडे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here