Home महाराष्ट्र महात्मा बसवेश्वर यांची शिकवण म्हणजे सामाजिक फाळणी नष्ट करण्याचा सर्वात पहिला लढा...

महात्मा बसवेश्वर यांची शिकवण म्हणजे सामाजिक फाळणी नष्ट करण्याचा सर्वात पहिला लढा : जावेदखान मुलाणी

115

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : कुकुडवाड ता माण येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी जनसहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेदखान मुलाणी बोलत होते. महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेली लोकशाही संसद म्हणजेच अनुभव मंटपा ची कार्यशैली सर्वधर्म समभाव जागृत करणारी आहे, श्री बसवेश्वर महाराजांची वचनसाहित्ये सक्षम समाज घडवण्याचे कार्य करतात असे मत श्री मुलाणी यांनी व्यक्त केले, यावेळी
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले, यावेळी भारतीय मजदूर संघाचे जयंतकुमार शेटे, शंकर शेटे, माजी सरपंच तानाजी काटकर, धनंजय हुद्देदार, बंटी राजेघाडगे, प्रीतम तमशेट्ये, लक्ष्मण विभूते, विकास शेटे विजय काटकर, कृपेश इनामदार व ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here