सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686109
जामा मस्जिद कुकुडवाड येथे आज इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्यातील रोजा इफ्तार चे आयोजन म्हसवड पोलीस स्टेशन चे ए पी आय राजकुमार भुजबळ साहेब यांनी केले होते. याप्रसंगी श्री भुजबळ बोलत होते.
समाजात शांतता, बंधुता टिकवून ठेवण्यासाठी एकत्र काम करू असा संदेश आजच्या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून देण्याचा संकल्प करूया. सत्य, त्याग व समर्पण असा पवित्र संदेश कुराणमध्ये आहे या त्रिसूत्रीचे पालन करून समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले.
यावेळी श्री भुजबळ यांचेसोबत म्हसवड पोलीस स्टेशन चे गोपनीय विभागाचे श्री अभिजित भादुले, कुकुडवाड पोलीस पाटील यांचे वतीने श्री उमेश काटकर पाटील, कुकुडवाड ग्राम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विक्रम काटकर व कुकुडवाड मुस्लिम जमातचे सदस्य उपस्थित होते