बाळासाहेब ढोले, पुसद, तालुका प्रतिनिधी
पुसद -भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरयांच्या 132 व्या जयंती दिनानिमित्त भीम आर्मी सामाजिक भारत एकता मिशन यांच्यातर्फे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, पुसद शहर बस स्थानक शेजारी सत्य शांती हॉस्पिटल समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने पुसद शहराच्या प्रमुख मार्गावर येणाऱ्या जयंती दिनाच्या रॅली व या रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या समस्त धम्म बांधव यांच्या साठी अल्पोहार म्हणून खिचडी वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून,शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ त्यांचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
विविध मान्यवरांच्या हस्ते समस्त धम्म बांधवांना खिचडी वाटप व थंड पेयाचे वाटप करण्यात आले
यावेळी प्रामुख्याने उपस्थित
भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, भीम आर्मी जिल्हा सचिव धनंजय कांबळे, प्रज्ञा पर्व माजी अध्यक्ष विठ्ठल खडसे सर , बुद्ध रत्न भालेराव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष , शहराध्यक्ष उबाळे , संदीप वाठोरे, दीपक भवरे सर, पत्रकार राजेश ढोले, नरेंद्र पाटील सर नितीन खाडे, राजू भालेराव महानंदा कांबळे व समस्त धम्म बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.