


🔹जयंत दारीद्रयनिर्मूलन मधून मुंबईत केली महागडी अवघड हृदय शस्त्रक्रिया
✒️इस्लामपूर प्रतिनिधी(इकबाल पीरज़ादे)
इस्लामपूर(किसाननगर)(दि.25जानेवारी):-येथे रहाणाऱ्या निकम कुटुंबातील युवांश्री या चिमुकलीच्या ह्रदयाची जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने मुंबई येथील एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिले. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी ही शस्त्र क्रिया करण्यासाठी मोठे सहकार्य केले. या कुटुंबाने मुंबईहुन इस्लामपूर येताच युवा नेते प्रतिकदादा पाटील यांची कारखाना कार्य स्थळावर भेट घेवून कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी प्रतिकदादा पाटील यांनीही या कुटुंबाची आस्थेवाईक चौकशी केली.
राहुल निकम हे काही महिन्यांपूर्वी पुण्या हून इस्लामपूरला आले आहेत.
त्यांच्या लहान मुलीस ह्रदयाचा त्रास होवू लागला असता, त्यांनी तिला इस्लामपूर,सांगली व कोल्हापूर येथील डॉक्टरांना दाखविले. त्यांनी तिच्या ह्रदयाची तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र निकम कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शस्त्रक्रिया करणे लांबत चालले होते. यावेळी महिला राष्ट्रवादीच्या प्रदेश सदस्या कमल पाटील यांच्या संपर्कात हे कुटूंब आले. त्यांनी अभियानाचे संघटक राजाराम जाधव,समन्वय क इलियास पिरजादे यांच्याशी संपर्क करून मुलीच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितले. त्यांनी तातडीने रेशन कार्डसह कागदपत्रांची पूर्तता केली आणि मुंबई येथील एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये साधारण अडीच-तीन लाखांची ह्रदय शस्त्रक्रिया मोफत आणि यशस्वी केली. डॉ.प्रिया प्रधान व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे यांनी मोठे सहकार्य केले.
राहुल निकम,आई श्रावणी निकम,आजी जयश्री निकम यांनी चिमुकलीसह प्रतिकदादा पाटील यांची कारखान्यावरती भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. “आमच्या मुलीस आपल्यामुळे जीवदान मिळाले. आपले मोठे उपकार झाले,ते आम्ही कसे फेडणार? या शब्दात या कुटुंबाने ऋण व्यक्त केले. यावेळी प्रतिकदादा पाटील यांनी ‘काळजी करू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तिच्या प्रकृतीला जपा,’असा सल्ला दिला.यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,इस्लामपूर येथील उद्योजक महेश पाटील,दत्ता फल्ले, अभियान चे समन्वयक इलियास पिरजादे, संघटक राजाराम जाधव, विनायक जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.
*फोटो ओळी- राजारामनगर येथे युवांश्री निकम या चिमुकलीची तिच्या ह्रदय शस्त्रक्रिये नंतर चौकशी करताना युवा नेते प्रतिकदादा पाटील. समवेत तिचे वडील राहुल निकम*













