Home महाराष्ट्र गुड शेपर्ड स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थांना समारंभ संपन्न…

गुड शेपर्ड स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थांना समारंभ संपन्न…

233

🔹यशाची चव चाखण्यासाठी आयुष्याचं गणित यशस्वीपणे सोडवा — अनुराधा भावे

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.31जानेवारी):- येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी शिक्षिका भारती तिवारी यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून सांगितले की, शालेय जीवनातील अतिशय महत्वपूर्ण मानले जाणारे वर्ष म्हणजे दहावीचे वर्ष आहे. इयत्ता नववीच्या विद्यार्थांनी दहावीच्या विद्यार्थांना निरोप दिला. याप्रसंगी इ.नववीचा कुणाल चव्हाण तसेच दहावीचे विद्यार्थी यश जाधव, प्रणित भाटीया, श्रेया भावे, मनस्वी पवार, मनस्वी पाटील आदींनी आपल्या मनोगतातून शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांच्या प्रति असलेल्या आदर, प्रेमाच्या भावना व्यक्त करतांना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. जेष्ठ शिक्षिका अनुराधा भावे यांनी वडीलकीचा सल्ला दिला तसेच सागर गायकवाड यांनी स्पर्धात्मक जगाला सामोरे जा, असे मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापिका नाजनिन शेख, प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित या सर्वांनी शाळेचा नावलौकिक वाढवा तसेच आपल्या आई – वडिलांचे व शिक्षकांचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहा असं अनमोल मार्गदर्शन केलं.कार्यक्रमात स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, प्रिया मोरे, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आणि नववी आणि दहावीचे विद्यार्थी – विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत सूत्रसंचालन भारती तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मण पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here