Home महाराष्ट्र ग्रामपंचायत अर्हेर-नवरगाव तर्फे आयोजित हळदी- कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

ग्रामपंचायत अर्हेर-नवरगाव तर्फे आयोजित हळदी- कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

203

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 28 जानेवारी):- तालुक्यातील ग्रामपंचायत अर्हेर-नवरगाव यांच्यावतीने आयोजित मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. मकरसंक्रांत ते रथ सप्तमी या दिवसांत ठिकठिकाणी वैयक्तिक, तसेच सार्वजनिक स्तरावर हळदीकुंकू समारंभ साजरे केले जातात. यानिमित्ताने 27 जानेवारी रोजी अर्हेर-नवरगाव ग्रामपंचायत द्वारा हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला.

हळदी कुंकू व महिला मेळावा यानिमित्ताने वाण वाटप तसेच काही फुलांची झाडे वाटप करण्यात आली. काही महिलांनी उखाणे घेऊन हळदी कुंकू कार्यक्रमाला आनंदमयी बनवले.ग्रामपंचायत भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. संपुर्ण ग्रामपंचायत भवन व पटांगण महिलांनी खचाखच भरून गेले होते .

यावेळी अर्हेर- नवरगाव येथिल महिलांनी हळदी कुंकू च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावातील सरपंचा दामीनीताई जागेश्वर चौधरी, उपाध्यक्ष सुनीताताई डाकराम डोनाडकर, उद्धघाटक पूनम सतीश ठेंगरे,सह उद्घाटक कांताबाई नानाजी वाघमारे, प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका व सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच गावातील सर्व महिला यावेळी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here