Home महाराष्ट्र प्रजाकसत्ता दिनानिमित्य रक्तविर सेना फाउंडेशन तर्फे चोरटी येथील विद्यार्थ्यांना बुक व पेन...

प्रजाकसत्ता दिनानिमित्य रक्तविर सेना फाउंडेशन तर्फे चोरटी येथील विद्यार्थ्यांना बुक व पेन वितरण

167

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 28 जानेवारी):- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पदपर्श झालेले गाव म्हणजे तालुक्यातील चोरटी ह्या गावाची ओळख आहे.26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.

रक्तविर सेना फाउंडेशनचे नवे संकल्प म्हणून प्रजाकसत्ता दिनानिमित्य चोरटी येथील विद्यार्थ्यांना बुक व पेन वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांना रक्तविर सेनेचे अध्यक्ष निहाल ढोरे, उपाध्यक्ष मायासिंग बावरी, कोषाध्यक्ष प्रणय ठाकरे, जिल्हा नियोजन प्रमुख तुषार भागडकर, निशाताई मडावी सरपंच चोरटी, सुधाकर कांबळे उपसरपंच, हेमंत रामटेके ग्रामसेवक, राजेश खरकाटे अध्यक्ष शा.व्य.स, सुरतकौर बावरी उपाध्यक्ष शा.व्य.स, सुनीताताई वलके पोलीस पाटील, मोरेश्वर उईके अध्यक्ष सा.ग्रा.चोरटी, चंद्रशेखर मानकर मुख्याध्यापक, हर्षकुमार गायधने स.शि, ज्ञानेश्वर शिंदपुरे स.शि, बी.आर. अटोरे शिक्षक व युवराज बनकर शिक्षक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाला रक्तविर सेना शाखा चोरटीचे सदस्य अविनाश रामटेके, प्रितम ढोरे, प्रफुल कामडी, लोचन राऊत, समीरसिंग भुरानी, मंगेश भागडकर, सत्यपाल ढोरे, सोनम कामडी, राजू कामडी, कुणाल राऊत, नरेंद्र नखाते व गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here