Home महाराष्ट्र सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त “मोफत नेत्र तपासणी” शिबिर संपन्न

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त “मोफत नेत्र तपासणी” शिबिर संपन्न

165

✒️विशेष प्रतिनिधी(स्वप्निल गोरे)

कुंभारी(दि.9जानेवारी):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कै. अंबाबाई बबन पवार बहुउद्देशीय संस्था कुंभारी (हनुमान नगर) येथे दिनांक 03/01/ 2023 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त “मोफत नेत्र तपासणी” शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. राधाबाई बळीराम पवार तसेच गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. अर्चना पवार व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तांड्याचे नायक सुधाकरराव राठोड, बळीराम रामसिंग जाधव, संस्थेचे सदस्य गणेश पवार, नामदेव पवार, व तसेच ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वाघमारे सर यांनी केले. आणि तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा. डॉ. दत्ता पवार सर यांनी “सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणाचा प्रसार व प्रचार करत असताना सावित्रीबाई फुले यांना पूर्वीच्या समाजाच्या रुढी प्रथा व परंपरेला तोंड देण्याचा प्रयत्न करावा लागला व त्यातूनच आजच्या साहेबांना अधिकार हक्क आणि सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त झाले आहेत.

” असे मत व्यक्त केले त्याप्रसंगी डॉ. शहा व डॉ. उमेश जाजू यांच्या मार्गदर्शनातून गावामध्ये”मोफत नेत्र तपासणी शिबिर” राबवून गावातील नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करत असताना त्यांच्या मनातील सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच जवळपास एकूण 80 नागरिकांचे डोळे तपासणी करून त्यांना पुढील मार्ग दाखविण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सौ. अर्चना पवार यांनी वेगवेगळे भूमिकेतून सावित्रीच्या लेकी म्हणून पटवून देण्याचा प्रयत्न नाटकातून करण्यात आले त्यावेळी गावातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रम यशस्वीरीत्या करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद कुंभारी व हनुमान नगर येथील मुख्याध्यापक श्री. गडदे सर, श्री. पोपळकर सर, तसेच सहाय्यक शिक्षक श्री. वाघमारे सर, श्री. चव्हाण सर, श्री. तारे सर तसेच अंगणवाडी सेविका. आशा वर्कर व ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य श्री ईश्वर जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here