Home महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखांचे शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अनावरण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखांचे शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अनावरण

220

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.16 डिसेंबर):-राज्यात सत्तांतरन झाल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने राज्यभरात कार्यकर्ते जोडण्याचा विडा हाती घेतला असून संपूर्ण राज्यभर ठाकरे गटाला चांगला प्रतिसाद मिळत असून युवकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात पक्ष प्रवेश वाढला असून राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक ही मोहीम राबवत शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे अनावर काल दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून केले.

या शाखा अनावरण सोहळ्यात चिल्ली,आमनपुर तांडा,वरुड बीबी फाटा, सुकळी , नागेशवाडी, बेलखेड, वसंत नगर पोफाळी, विडूल, शहीद भगतसिंग वार्ड उमरखेड, राजेंद्रप्रसाद वार्ड उमरखेड या ठिकाणी शिवसेना युवासेना शाखा फलकाचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीमान प्रवीण शिंदे यांच्या शुभहस्ते युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महागाव तालुका प्रमुख प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, उपजिल्हाप्रमुख अँड. बळीराम मुटकुळे, उपजिल्हा संघटक राजेश खामणेकर, तालुकाप्रमुख सतीश नाईक ,व्यापारी आघाडी जिल्हा संघटक प्रशांत पत्तेवार ,शहर प्रमुख गजेंद्र ठाकरे. डॉ.अजय नरवाडे, माजी शहर प्रमुख संदीप ठाकरे, संजय पळसकर अमोल तिवरंगकर, शिवाजी रावते, संभाजी गोरठकर , सचिन साखरे राजेश कवाने ,अरविंद भोयर, शेषराव इंगळे, राहुल सोनूने ,नितीन शिंदे ,अजय कानडे,अमोल धुमाळे ,गजानन पाटील सुरोसे, रवी वानखेडे नागेश गोरेवाड, संतोष जाधव, गोपीचंद दोडके, संदीप शिलार, बाळासाहेब खामणेकर ,सुधाकर जाधव ,गोपाल कलाने, निलेश जैन, विकास मुलंगे प्रकाश फटाले, बाळासाहेब भोकरे, वसंत देशमुख, विलासराव गवळे, शैलेश भोयर, भारत भोजरे, बाळासाहेब शेवाळकर, बाळासाहेब देशमुख, रमेश शिंदे, लक्षमन देवकर, दुर्गेश उन्हाळे, संभाजी गालफाडे, गोपाल देवकते, विनोद पोंगणे ,अक्षय दळवी, ज्ञानेश्वर लोखंडे, अनिकेत कल्याणकर, पत्रे काळे, सोळंके. असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना युवासेना फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित शिवसेना युवासेना कार्यकर्ते व गावकरी मंडळींना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी मार्गदर्शन करत योग्य सूचना दिल्या याप्रसंगी शिवसेना युवा सेना चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

समृद्धी महामार्ग- महाराष्ट्राची स्वप्नपूर्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here