Home महाराष्ट्र तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईने माण तालुक्यात खळबळ; पानटपरीधारकांनी घेतली धास्ती

तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईने माण तालुक्यात खळबळ; पानटपरीधारकांनी घेतली धास्ती

425

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.14जून):-महाराष्ट्रात प्रशासनातील कडक शिस्त आणि धडक कारवाईसाठी ओळख असलेले अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या अलीकडील कारवाईच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यातील पानटपरीधारकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात प्रशासनाकडून कारवाईची शक्यता लक्षात घेऊन अनेक पानटपरीधारकांनी आता आपला मूळ व्यवसाय म्हणजेच पान विक्रीकडे पुन्हा मोर्चा वळवला आहे.

माण तालुक्यातील अनेक पानटपऱ्यांवर पूर्वी विविध प्रकारचा गुटखा, सुगंधी तंबाखू आणि अन्य बंदी असलेल्या पदार्थांची विक्री होत असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र प्रशासनाकडून कडक पावले उचलली जाण्याची शक्यता निर्माण होताच अनेक व्यावसायिकांनी अशा पदार्थांची विक्री थांबवून केवळ पान, सुपारी, थंड पेये आणि इतर कायदेशीर वस्तूंची विक्री सुरू केल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांनी देखील या बदलाचे स्वागत केले असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा सकारात्मक निर्णय असल्याचे मत व्यक्त केले आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढणारे गुटखा सेवन रोखण्यासाठी अशा कारवाया प्रभावी ठरू शकतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, संबंधित विभागाकडून गुटखा विक्रीविरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे माण तालुक्यातील पानटपरीधारक सध्या सावध भूमिका घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here