Home महाराष्ट्र मराठी भाषा,व संस्कृती टिकविण्यासाठी मराठी शाळा टिकली पाहिजे 

मराठी भाषा,व संस्कृती टिकविण्यासाठी मराठी शाळा टिकली पाहिजे 

80

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.15जून):-मराठी भाषा,संस्कृती टिकविण्यासाठी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी आणि या शाळा सक्षमपणे टिकून राहाव्यात यासाठी पालक व शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सखुबाई रामेश्वर बचाटे यांनी केले.त्या जि.प.कें.प्रा.शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव कार्यक्रमात बोलत होत्या.

सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेमध्ये (दिनांक १५ जून सोमवार) रोजी शैक्षणिक वर्ष प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्रारंभ करण्यात आला.यावेळी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.शाळेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,प्रमाणपत्र व पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सखुबाई रामेश्वर बचाटे,मुख्याध्यापक कुंडलिक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे,असे आवाहन केले.कार्यक्रमास शाळेचे उपाध्यक्ष स्वाती हनुमान बचाटे,पंचायत समिती सदस्य जयप्रकाशराव बचाटे,पोलीस पाटील रामेश्वर बचाटे,सरपंच प्रतिनिधी भागवत बांगे,मा.सरपंच अमोल बचाटे,सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यशोदा जाधव,पद्मिनी सोनवणे,विनोद व्हावळे,अमर राऊत,सुनील जाधव तसेच शिक्षकवृंद व पालकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here