Home महाराष्ट्र निमंत्रित व नवोदित कवींनी रंगवले काव्य संमेलन

निमंत्रित व नवोदित कवींनी रंगवले काव्य संमेलन

47

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर(दि.12जून):-मानवी मनातील भाव-भावना, संवेदना आणि जीवनानुभव यांना शब्दरूप देण्याचे सामर्थ्य कवितेत असते. संवेदनशील मनाच्या व्यक्तीच दर्जेदार कविता लिहू शकतात. आज मोठ्या प्रमाणावर कविता लिहिली जात असली तरी आशयघन आणि सकस कविता दीर्घकाळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहते. त्यामुळे उत्तम काव्यनिर्मितीसाठी सातत्यपूर्ण वाचन आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रकाश होळकर यांनी केले.

शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात जाधव लॉन्स येथे प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे काव्य संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी चित्रपट गीतकार कवी प्रकाश घोडके व पाठ्यपुस्तक कवी हनुमंत चांदगुडे प्रमुख उपस्थित होते.

या काव्य संमेलनात बाळ पाटील, भास्कर निर्मळ, दशरथ शिंदे, शारदा घोडके, डॉ. कैलास दौंड, अर्जुन देशमुख, शुभांगी राऊतमारे, लक्ष्मण खेडकर, वर्षा चौबे, डॉ. स्वाती पाटील, वसंत मुरदारे, नागेश शेलार, डॉ. प्रवीण जाधव, संदीप राठोड, स्नेहल डाडर, नवनाथ केंदळे, अनिलकुमार होळकर आणि रिता जाधव यांनी आपल्या विविधांगी काव्यरचना सादर करून रसिकांची दाद मिळवली.

या बहारदार काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील, शर्मिला गोसावी आणि स्वाती ठुबे यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा डॉ संदीप सांगळे, स्वागतध्यक्ष सुरेश बनसोडे,प्रा.माणिकराव विधाते, महादेव गवळी, सिद्धनाथ मेटे, सचिन चोबे, पांडव पुरी, संतोष कानडे, विलास साठे, प्रा.एल. बी. जाधव, डॉ.महावीरसिंह चौहान, डॉ.तुकाराम गोंदकर, राजेंद्र चोभे, साहेबराव तुपे, सुमेध ब्राह्मणे, हरिभाऊ नजन, प्रशांत सूर्यवंशी, प्रा.डॉ.संजय पाईकराव, उमेश घेवरीकर, प्रा. डॉ. दिगंबर सोनवणे, राजेंद्र पवार, देविदास अंगरक, सुनील धस, पी. एन. डफळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

         पुणे येथील ज्येष्ठ कवयित्री माधुरीताई मरकड यांच्या अध्यक्षतेखाली स्व.अरुण आहेर कवी कट्ट्यावर खुल्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रा. शशिकांत शिंदे, सुभाष सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पत्रकार बाळासाहेब कोठुळे व सुरेखा घोलप यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या या काव्य संमेलनात आनंदा साळवे, संदीप पाचारणे, राहुल शिंदे, शरद धलपे, शामा मंडलिक, प्रतिभा बोबे, रुक्मिणी नन्नवरे, निरू जगताप, डॉ.अर्चना घोडके, कल्पना तुपे, एम. पी. दिवाण, वर्षा भोईटे, रूपचंद शिदोरे, विठ्ठल सोनवणे, विनय पिंपरकर, उमादेवी राऊत, समृद्धी सुर्वे, सुवर्णलता गायकवाड, क्रांती करंजगीकर, प्रबोधिनी पठाडे, स्वाती राजेभोसले, आत्माराम शेवाळे, बाळासाहेब मुंतोंडे, प्रमोद येवले, विद्या जाधव, ऋता ठाकूर, सुनिता तागड आणि सुरेखा आडम यांनी आपल्या कविता सादर केल्या.

संमेलन यशस्वी करण्यासाठी संजय खामकर, परिमल निकम, जयंत गायकवाड, राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी, मकरंद घोडके, भारत गाडेकर, भगवान राऊत आणि हरिभाऊ नजन यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रामदास कोतकर, मारुती खडके, ज्ञानदेव उंडे, सरला सातपुते,मारुती सावंत यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.

काव्याच्या विविध रंगांनी सजलेल्या या संमेलनात निमंत्रित आणि नवोदित कवींनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यामुळे संपूर्ण वातावरण साहित्यरसाने ओथंबून गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here