Home महाराष्ट्र भारतातील बुद्धिजीवी विचारवंत कुठे आहेत?

भारतातील बुद्धिजीवी विचारवंत कुठे आहेत?

136

माणसाला माणूस बनण्याकरिता संस्कारांची आवश्यकता आहे. संस्कारावीना माणूस बिघडतो व सुसंस्काराने माणूस घडतो. प्रत्येक मानव प्राणी सुसंस्कारीत व्हावा यासाठी प्रत्येक व्यक्तीला धर्म आहे. धर्म हा समतावादी विचारच असला तर, दया, करुणा, समता स्वातंत्र्य हे त्यांच्या वागणुकीतून दिसून येतात. धर्मच हा विषमता शिकवत असेल तर प्रत्येक माणूस हा स्वार्थी आणि निर्दयी बनलेला असतो.त्याचे एकंदरीत वागणे सर्वच मानव, प्राणी, पशू, पक्षी यांच्यासाठी हानिकारक असते. पण ब-याचदा आपण धर्म हा शब्द ऐकतो पण ऐकून त्याचे चिंतन मनन करीत नाही, स्वतःच्या जीवनात ते विचार उतरवत नाही, म्हणून योग्य काय आणि अयोग्य काय, कुशल काय आणि अकुशल काय यातील भेदच आपल्याला समजत नाही. रोज अगरबत्ती लावल्याने फूल हार अर्पण केल्याने देव देवी प्रसन्न होतील आणि माझ्या मनात असलेल्या सुप्त इच्छा पूर्ण होतील. या भ्रमात राहने म्हणजेच अज्ञान होय. तर आपली कृती, आचरणच आपल्या धर्माची खरी ओळख दाखवत असते. आणि आहे.देशात सध्या जे वातावरण निर्माण झाले आहे. ते माणसा माणसात भेद भाव निर्माण करणारे आहे.स्वार्थसाठी सत्ताधारी माणूस मानवाची वस्ती जमीन नष्ट करता करता,मुके प्राणी,पशू पक्षी राहणारे झाडे वने नष्ट करायला लागला आहे. आंध्र प्रदेशातील चारशे एकर वन विभागाची जमीनी वरील वन जेसीबी ने नष्ट करतांना मुक्या प्राणी पक्षी विविध प्रकारचे जनावरे यांची दया आली नाही त्यांना आपण मानव कसे म्हणावे हाच प्रश्न पडतो.अशा वेळी देशातील बुद्धिजीवी विचारवंतानी पुढे आले पाहिजे. पण ते ही जाती धर्माच्या चौकटीत बंधीस्थ झाल्याचे स्पष्टपणे दिसते. देशातील काही बुद्धिजीवी विचारवंत बोलतात,लिहतात पण त्यांचा आवाज दाबल्या जात आहे.त्यांना माणसाकडून योग्य प्रतिसाद सहकार्य मदत मिळत नाही.तरी तो शांत बसत नाही. तो आज कालच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्त होत असतो.आजकाल सोशल मीडियावर एक गोष्ट सातत्याने जाणवते द्वेष,विशेषतः मुस्लिम समाजा विरोधात.हे द्वेषाचं विष पद्धतशीरपणे पसरवलं जाते, आणि अनेकदा त्यामागे राजकीय हेतू दिसतो.पण विचार करा या द्वेषाच्या वादळात खरं काय हरवतंय?

      महागाई दिवसेंदिवस वाढतेय,तरुणांना रोजगार मिळत नाही,शिक्षण घेण्याच्या वयात सरकारी शाळा बंद झाल्यामुळे शिक्षण महाग झाले.ते देण्यास आई वडील असमर्थ ठरत आहेत. सरकारची सार्वजनिक आरोग्य सेवा खाजगीकरणाकडे वेगाने जात असल्यामुळे आरोग्य व्यवस्था सेवा नाही तर धंदा झाल्यामुळे पूर्णपणे कोलमडली आहे. त्यावर बुद्धिजीवी विचारवंत, साहित्यिक,संपादक यांनी आसूड ओडले पाहिजे. तेच चर्चा करत नसल्यामुळे सर्व सामान्य माणूस पण बोलायला घाबरत आहे. तोच सर्वसामान्य माणूस मात्र आपसात बस,रेल्वे प्रवासात सार्वजनिक ठिकाणी कोणत्या ही विषयावर चर्चा करतो.कोणाच्या टोपीवर,नमाजवर,किंवा खानावळीवर!.

    हे प्रश्न तुमचं-आमचं आयुष्य ठरवत नाहीत.पण शिक्षण,रोजगार,नोकरी,आरोग्य,अन्न,वस्त्र निवारा हे जरूर ठरवत असतात.मी कट्टर हिंदू आहे असी कट्टरता बाळगल्याने आपल्याला वाटतंय की आपण आपल्या धर्माचं रक्षण करतोय.पण खऱ्या अर्थानं आपण आपल्या समाजाचं,देशाचं नुकसानच करतोय,कारण जेव्हा द्वेष वाढतो,तेव्हा विश्वास संपतो.आणि विश्वासा शिवाय कुठलाही देश पुढे जात नाही.हे सांगण्याचे काम देशातील बुद्धिजीवी विचारवंत,साहित्यिक,संपादक यांनी केले पाहिजे तेच आज देशात होत नाही.

     भारतातून जगातील अनेक देशात तथागत गौतम बुद्धाच्या मानव दुख मुक्तीचा संदेश गेला. म्हणूनच त्या देशातील नागरिक म्हणतात “युद्ध नको बुद्ध हवा.” आज भारतात बुद्ध नको युद्ध हवे असा संदेश जात आहे. महाबोधी महाविहार मुक्ती साठी दोन महिन्यापेक्षा जन आंदोलन सुरू होते. त्यांची दखल राज्य सरकार व केंद्र सरकार घेतली नाही. आपल्या घरावर,धर्म स्थळावर कोणी कब्जा केला तर आपण कोणाकडे दाद मागावी हाच प्रश्न आज शील संपन्न बौद्ध भिख्खू धम्म उपासक विचारत आहेत.यावर देशातील बुद्धिजीवी विचारवंत,साहित्यिक,संपादक यांनी रोख ठोक भूमिका मांडणे अपेक्षित आहे.हा एका जातीच्या समाजाचा प्रश्न नाही. उद्या तो सर्वच जातीच्या समाजाच्या धर्म स्थळाचा होऊ शकतो.

     भारतीय नागरिकांनो चला,पुन्हा विचार करूया आपण एकमेकांना शत्रू मानणार,की समस्यांना? आपण द्वेष पेरणाऱ्यांच्या मागे जाणार,की उत्तरदायित्व मागणाऱ्यांच्या?. वेळ आलीय समाज म्हणून जागं होण्याची.कारण देश म्हणजे आपण सर्व धर्म,सर्व जाती,सर्व भाषा आणि एकत्रच आपण बळकट आहोत.भारतात सध्या सोशल मीडिया प्रत्येक माणसांच्या हातात असल्यामुळे तो सकारात्मक किंवा नकारात्मक विचाराचा वाहक बनत चालला आहे. द्वेषमुलक पोस्ट्सपेक्षा जास्त घातक असते “शांतता” जेव्हा आपण खोटी,द्वेषमूलक पोस्ट बघतो आणि काहीच बोलत नाही, तेव्हा ती पोस्ट तिथेच थांबत नाही ती पुढे पाठवली जाते,आणखी लोकांपर्यंत पोहोचते,आणि हळूहळू एक समांतर असत्य सत्य तयार होते. आणि मी काही बोलत नाही म्हणजे मी समर्थन करत नाही.असे आपल्याला वाटते.पण अशा वेळी मौन हे सहमतीसारखंच घेतले जाते.बहुतेक लोक काही बोलत नाहीत कारण:वाद नको वाटतो.कोणी “देशद्रोही” ठरवेल याची भीती वाटते.माहिती कमी असते.किंवा वाटते.आपण बोलून काय फरक पडणार? पण फरक पडतो. कुणीतरी विरोध केल्यावरच दुसऱ्यालाही वाटतं, “हो,मी एकटाच नाहीय.” सत्याला आवाज द्यावा लागतो नाहीतर खोटं ओरडत राहतं. वाह्यात पोस्ट आल्यावर तुम्ही खालील प्रतिवाद करू शकता.पोस्ट पाठवणाऱ्या ग्रुप वरील मित्रांना विचारा मित्रा म्हणजे पुन्हा धार्मिक द्वेष? चल,आता काहीतरी कामाचं शेअर कर ना!.नोकरी,शिक्षण,आरोग्य यावर काही आहे का?

    अशी ही पोस्ट फॉरवर्ड खरंच आहे का? की भावना पेटवा आणि मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवा’ हीच योजना असते. त्यात आपण अलगत फसत जातो.काही लोकं द्वेष पसरवतात आणि आपण गप्प राहतो हाच तर त्यांचा विजय असतो.मला सांगा हिंदू असो की मुस्लिम, त्याला पेट्रोल १०४ रुपयानेच मिळते नां?. पेट्रोल डिजेल,गॅस,अन्न धान्य,औषध सगळ्यांना लागते. तेव्हा एकमेकांवर नव्हे, परिस्थितीवर गांभीर्याने विचार करा.वैतागुण प्रश्न,समस्या सुटणार नाही.पोस्ट बघून राग येण्या आधी विचार करा कुणाच्या फायद्यासाठी आपल्यात फूट पाडली जाते?.प्रिंट मीडिया चॅनल मीडिया ही सत्य सांगणारे प्रचार प्रसार माध्यम राहिले नाही. तर ते मोदी ची गोदी मीडिया झाली आहे. सत्य असत्य करून दाखवण्याची आणि असत्य सत्य करून दाखवण्याची कामगिरी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार, संपादकांना शोभणारी नाही.

म्हणूनच बुद्धिजीवी विचारवंत,साहित्यिक,संपादक यांनी यावर सोशल मिडियावर भाष्य केले पाहिजे.शिक्षण,आरोग्य, रोजगार,महागाई आणि भ्रष्टाचार यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आजकाल सोशल मीडियावर सातत्याने द्वेष,विशेषतः मुस्लिम समाजाच्या विरोधात. हे द्वेषाचं विष पद्धतशीरपणे पसरवलं जाते,आणि त्यामागे राजकीय हेतू स्पष्टपणे दिसतो.त्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण व्हावा ह्यासाठी खेळलेली “एक जीव घेणी” चाल आहे.ह्या अगोदर इतके हमले झाले, पण कधी धर्म विचारला नाही.आले गोळ्या घातल्या आणि पळून गेले.आताच का धर्म विचारायची वेळ आली आतंकवाद्यावर.मोदींनी त्याच दिवशीचा जम्मू काश्मीर दौरा रद्द केला आणि विदेशात का गेले.नेमके त्याच दिवशी पहलगाम येथील बंदोबस्त का बाहेर पाठवला गेला.रोज तेथे पर्यटकांच्या सुरक्षितेकरिता बंदूक धारी बंदोबस्त असतो.

मग त्याच दिवशी बंदोबस्त का नव्हता.भारतात सर्वात जास्त जवान तैनात केले जातात, तेथे २६ लोक मारली जातात आणि एक ही आतंकवादी का सापडत नाही.असे प्रश्न आपण विचारने गुन्हा आहे.गोदी मिडियाला जे सांगेल त्या बातम्या चोवीस तास दाखवल्या जाणार.त्यांचे अंध भक्त सोशल मिडियावर वेग वेगळ्या असत्य पोस्ट बनवून शेयर करतील.म्हणूनच आपल्याला जागे व्हावे लागेल. देशात जी असुरक्षित वाढत चालली आहे.त्यात आपण आपले कुटुंब सुरक्षित नसेल तर काय करावे लागेल.त्यावर देशातील बुद्धिजीवी विचारवंत, साहित्यिक,संपादक यांनी नागरिकांना योग्य दिशा दाखविण्याचे काम केले पाहिजे.अन्यता त्याचे परिणाम सर्वाना भोगावे लागतील.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप मुंबई)मो:-९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here