Home महाराष्ट्र डॉ.मधुसूदन केंद्रे यांच्या हस्ते अर्हत सर्जिकल हॉस्पिटलचे उद्घाटन 

डॉ.मधुसूदन केंद्रे यांच्या हस्ते अर्हत सर्जिकल हॉस्पिटलचे उद्घाटन 

131

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.3जून):-विधानसभेचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या हस्ते फित कापुन दिनांक 1 जून 2026 रोजी शहरातील भाग्यनगर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या अर्हत आरोग्यमय सर्जिकल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.

 या हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपी,मुळव्याध/ भगंदर ,कॅन्सर ,हर्निया ,पित्ताशयाची पिशवी, अपेंडिक्स, थायरॉईड सर्जरी, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया व वरील सर्व रोगाच्या शस्त्रक्रिया ह्या अत्याधुनिक सुविधायुक्त अशा हॉस्पिटलमध्ये डॉ.भगवान कांबळे एम एस सर्जन व डॉ .निशा कांबळे रेडिओलॉजी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. 

या उद्घाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव पवार, माजी नगरसेवक मनोहर महाराज केंद्रे ,खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गंगाधर पवार ,वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष मनोहर वावळे ,शिवसेना तालुका प्रमुख जानकीराम पवार ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष नरहरी भोसले, वसंत ओगिले ,शिवाजी साळवे, माणिकराव शिंदे ,रामकिशन शिंदे, ज्येष्ठ व्यापारी सुभाष नळदकर, परभणी जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष बालाजी बिडगर, मुळीचे सरपंच गणेशराव भोसले ,उपसरपंच खोबराजी भुंमरे, लिंबाजी देवकते ,सरस्वती शाळा मुळी चे सचिव सतीश भोसले व सर्व शिक्षक हे यावेळी उपस्थित होते .

या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत कांबळे यांनी केले तर आभार लक्ष्मण कांबळे यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here