Home महाराष्ट्र 9 जून ला सन्मान द्या व सन्मान घ्या-पत्रकार संजीव भांबोरे यांच्या सामाजिक...

9 जून ला सन्मान द्या व सन्मान घ्या-पत्रकार संजीव भांबोरे यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा होणार सत्कार

126

▪️पहेला येथे दैनिक माझा मराठवाडा पेपरचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.16मे):-सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पत्रकार, कवी, लेखक , कृषी क्षेत्रातील अधिकारी,साहित्यिक, प्रबोधनकार, डॉक्टर, वकील, दिव्यांग, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी, यांचा समाजासाठी योगदान आहे असे कार्यकर्ते, अशा कार्यकर्त्यांचा माजी खासदार बोधसिंग भगत, माजी खासदार व अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.खुशाल बोपचे, दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर,अभिनेत्री चैताली भस्मे, अभिनेते अश्विनकुमार बघाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत दिमागदार सत्कार सोहळा 9 जून 2026 ला रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजता सम्यक बुद्ध विहाराच्या पटांगणात आंबेडकर वार्ड पहेला येथे वेळेवर पार पडणार आहे.

त्याचप्रमाणे वैशाली मडावी उर्फ लावण्या नृत्यांगना या सुद्धा सदर कार्यक्रमात उपस्थित राहून प्रबोधनात्मक गीतावर नृत्य सादर करतील.करिता सत्कार मूर्ती यांनी

 वेळेवर उपस्थित राहावे .सदर कार्यक्रमात जवळपास 50 सत्कारमूर्ती यांचा सत्कार करण्यात येणार आहे.असे कार्यक्रमाचे आयोजक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी एकापत्रकाद्वारे कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here